आष्टी : आष्टी पोलीसांच्या हद्दीत होत असलेल्या अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर आष्टी पोलिसांनी मागिल काही महिन्यांपासून कारवाया सुरु केल्या आहेत.
वारंवार कारवाई पण गुन्हेगारी थांबेना

पण वारंवार कार्यवाही करून देखील आष्टी पोलिसांना या गुन्हेगारीवर नियंत्रण करण्यास यश मिळेना तर परतूर तालुक्यातील पिंपळी धामणगाव येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर आष्टी पोलिसांनी कारवाई केली आहे. यात ६ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आष्टी पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आष्टी शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध्य वाळूची वाहतूक केली जाते पण आष्टी पोलिसांना काही आष्टी येथील वाहतूक काही दिसेना या मुळे पोलीसांच्या कर्तव्यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे की नेमके पोलीस दुर्बल होत आहे की गुन्हेगार शक्तिमान होत आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर पिंपळी धामणगाव येथे एका ट्रॅक्टरव्दारे अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती आष्टी पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे सपोनी तर पिंपळी धामणगाव येथे एका ट्रॅक्टरव्दारे अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती आष्टी पोलिसांना मिळाली होती. सचिन इंगेवाड, आर. एस. शेळके, गोकुळदास देवळे, विनोद वाघमारे यांनी पिंपळी धामणगाव परिसरात कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात विशाल दशरथ शेळके (२४, गुंज, ता घनसावंगी) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री बारा वाजता आष्टी पोलिस ठाण्यात वाहन जमा करून चालक गोकुळदास देवळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी दादा हरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






