सरपंच, ग्रामसेवक यांनी संगनमताने निधी हडपल्याचा आरोप ; चोकशी साठी उपोषण 

स्वराज्य वार्ता / राम राठोड 

प्रतिनिधी /आष्टी :- – परतूर तालुक्यातील सुरुमगाव येथील ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून कामे न करता ८ लाख ६७ हजार ५७७ रुपयांचा निधी उचलला आहे. यांची चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी परतूर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर मंगळवार (ता. 3) आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.

 

गटविकास अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सुरुमगाव येथील ग्रामपंचायत मधील पदराव्या वित्त आयोगातून विकास कामे न करता त्या कामाची कृती आराखड्यामध्ये सुध्दा  कुठलाही उल्लेख नाही. १५ व्या आयोगाच्या खात्यावर शिल्लक रक्कम पाहून त्या कामाचे अंदाजपत्रक न बनविता व कुठल्याही प्रशासकीय मान्यता न घेता ८ लाख ६७ हजार ५७७ रुपयांचा चे बिल सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून शासकीय रकमेचा अपहार केलेला आहे. याबाबत गटविकास अधिकारी परतूर यांना २८ ऑक्टोबर रोजी अर्जाद्वारे कळविले होते त्यांनी सुद्धा कोणतीही कारवाई केली नाही गेल्या पांच वर्षापासून असेच प्रकार होत आहेत नवीन सरपंच आल्यापासून ते ही मागील सरपंचाप्रमाणे कामे न करता निधी हडप करत आहेत त्यामुळे सुरुमगाव विकासापासून वंचित राहिले आहे तरी अपहाराबाबत समितीने मिळून योग्य ती चौकशी करून अपहार करणार्‍या सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर योग्य ती करवाई करून तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी मागणी करण्यात येत असून त्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात आला आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल