नवरात्रोत्सवानिमित्त आष्टीतील गजानन कॉलनी येथे विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन. 

स्वराज्य वार्ता / पी.डी सोळंके 

आष्टी : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आष्टी येथील अतिशय प्रतिष्ठित असलेल्या गजानन कॉलनीमध्ये आई जगदंबेची प्रतिष्ठापणा करण्यात आली असून नवरात्रोत्सव ऊत्साहात साजरा केला जात आहे. सामाजिक उपक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आला. प्रसंगी अनेक मुलांना गित, नृत्य, भारतीय कथक्कली, नाटक इ. साजरे करून ऊपस्थितांची मने जिंकली आणि कौतुकही.

कार्यक्रमासाठी आष्टी पो.स्टे. चे ए.पी.आय. श्री. सचिन इंगेवाड साहेब हे उद्घाटक म्हणून लाभले. तर श्री. संजय डोळसे सर यांनी सुत्रसंचलन केले. कार्यक्रमासाठी श्री. मोहन सोळंके सर यांनी मेहनत घेतली. तसेच आयोजक समिती आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरीक गजानन कॉलनी या सर्वांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांभाळली. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ज्ञानसाधना गुरुकुल आष्टी, ला.ब.शा. विद्यालय आष्टीसह अनेक शाळेतील मुलांनी सहभाग नोंदवला. आदर्श ऊपक्रम घेऊन नवोरात्र ऊत्सव साजरे करणारे गजानन कॉलनीकर यांचे परिसरात कौतुक होत आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल