स्वराज्य वार्ता

आष्टी येथे वीर जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात साजरी जयंती साजरी करताना कल्याणजी दळे व नाभिक महामंडळ

स्वराज्य वार्ता / राम राठोड 

आष्टी येथे नाभिक महामंडळ व अखिल भारतीय जीवा सेनेच्या वतीने वीर जिवाजी महाले यांची ३८९ वी जयंती दुपारी ३-३० वा डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक आष्टी येथे उत्साहात साजरी करण्यात आली.होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी या म्हणीतून प्रखर राष्ट्रीय बाण्याचा वारसा अजरामर करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक व एकनिष्ठ सेवक शूरवीर जिवाजी महाले यांची ही जयंती नाभिक महामंडळ व अखिल भारतीय जिवा सेना व महाराष्ट्र नाभिक महामंडळ व बारा बलुतेदारा चे अध्यक्ष कल्याण रावजी दळे व नाभिक महामंडळ आष्टी शहराध्यक्ष गणेश वैद्य उपाध्यक्ष रवि शिंदे सचिव महेश घुले अखिल भारतीय जिवा सेना अध्यक्ष सुरेश बर्वे डॉक्टर शंकर गंगथरे आष्टी चे सरपंच मधुकर मोरे लोणीचे सरपंच गजानन लोनीकर चौकानाना सौंदर्य दिपक भाळशंकर चव्हाण सर शोएब पठान व राणोजी कांबळे यांच्या उपस्थितीत जिवाजी महाले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले महाराष्ट्र नाभिक महामंडळ व बारा बलुतेदारा चे अध्यक्ष कल्याण रावजी दळे यांनी वीर जिवाजी महाले यांच्याबद्दल माहिती देताना सांगितले की जिवाजी महाले यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लाखोंचा पोशिंदा छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचविले होते त्यांची दरवर्षी आपण विविध ठिकाणी जिवा महाले यांची जयंती उत्साहात साजरी करत असतो जिवाजी महाले यांच्यासारखे अनेक शूरवीर आणि पराक्रमी योद्धे होते म्हणून स्वराज्य उभे राहिले अशी कल्याण रावजी दळे यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना दिली सरपंच गजानन लोनीकर यांनी देखील वीर जिवाजी महाले यांच्याबद्दल उपस्थितांना माहिती सांगितली यावेळी आसाराम वैद्य माझी जिल्हा अध्यक्ष बळीरामजी वैद्य माझी जिल्हा अध्यक्ष सुभाषरावजी काळे रतन सुरोशे ज्ञानेश्वर बर्वे दीपक वैद्य अकाश वैद्य पांडू बर्वे राजेश सवणे अशोक सवणे राजेश राऊत राजेश गोरे पांडुरंग बर्वे राम गोरे जनार्धन बर्वे अशोक वैद्य राजेश वाघमारे सोळंके सर रामेश्वर आप्पा सातपुते व गावातील नागरिक तसेच तरुण मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल