शास्त्रीविद्यालयात सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव

 स्वराज्य वार्ता प्रतिनिधी / पी डी सोळंके

आष्टी :- परतूर तालुक्यातील आष्टी येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य पी. आर. निर्वळ, रामराव घुगे,किशोर देशमुख,यु.एस.जोगदंड आदी सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांच्या कार्याचा संस्थेचे सचिव कपिल आकात यांच्या हस्ते शाल श्रीफळ,पुष्पहार व स्मृतीचिन्ह देवून नुकताच सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी प्राचार्य राजेश नवल हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सूर्यभान मोरे, भगवानराव थोरात, ओंकार काटे,वसंतराव जगताप यांची उपस्थिती होती.यावेळी श्री आकात म्हणाले की प्रामाणिक कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सर्वत्र गौरव होतो.प्रारंभी उप मुख्याध्यापक कलीदास जगताप वसंत धोंडगे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सुत्रसंचालन कैलास शेळके यांनी तर माधव सरनाईक यांनी आभार मानले. यावेळी प्राचार्य एल. के. बिरादार,माजी प्राचार्य अकुंशराव मोरे,निळकंट तौर, प्रविण चौरे,गणेश सोळंके, अमृतराव सवणे,सत्कार कुरेशी, मोहन बाण, अशोक काटे, विजय कडपे यांची उपस्थिती होती.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल