डॉ.शिवचरण उज्जैनकर यांचे वडील श्री मधुकरराव उज्जैनकर व मातोश्री सौ. अनुसयाबाई उज्जैनकर यांचा आदर्श माता पिता म्हणून सत्कार

स्वराज्य वार्ता / किरण पाटील

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचा 15 वा वर्धापन दिन फाउंडेशनचे राज्य सचिव छत्रपती संभाजी नगर येथील प्रा. डॉ. सुभाष बागल यांच्या अध्यक्षतेखाली व भारताची पहिली महिला सर्पमित्र राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त हिवरा आश्रम येथील वनिताताई बोराडे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले तर या कार्यक्रमाचे विशेष अतिथी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्ष अँड रोहिणीताई खडसे खेवलकर या होत्या याप्रसंगी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय काँग्रेसचे ओबीसी सेलचे उपाध्यक्ष डॉ. जगदीशदादा पाटील ,डॉ.प्रवीण पाचपांडे, विनोदभाऊ सोनवणे ,खामगाव य तसेच फाउंडेशनच्या विविध जिल्ह्यातील पदाधिका ऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत मुक्ताईनगर तालुक्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या 66 विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी म्हणून प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला ,याप्रसंगी मान्यवरांनी उज्जैनकर फाउंडेशनच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले व विद्यार्थ्यांचा गौरव म्हणजे येणाऱ्या पिढीला सुसंस्कृत करणे होय असे मान्यवरांनी आपल्या मनोगतात भावना व्यक्त केल्या.
दुपारच्या सत्रामध्ये विविध जिल्ह्यातील 51 मान्यवरांना तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य, मुख्याध्यापक ,शिक्षक, समाजसेवक व पत्रकार यांना प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले तसेच फाउंडेशनचे आजीव सभासद व विविध जिल्ह्याचे पदाधिकारी, पालक, शिक्षक, पत्रकार, समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी भारताची पहिली महिला सर्पमित्र वनिताताई बोराडे यांनी विविध सर्प दाखवून त्यांची उपस्थितांना माहिती दिली पर्यावरणाविषयी माहिती दिली याप्रसंगी अनेक मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी सापाला स्पर्श करून आनंद व्यक्त केला .याप्रसंगी जेडीसीसी बँक शाखा निमखेडी इच्छापूर येथील व्यवस्थापक तथा फाउंडेशनचे जळगाव जिल्हा सल्लागार एन.जी. शेजोळे साहेब यांनी डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचे वडील श्री मधुकरराव उज्जैनकर व आई सौ.अनुसया बाई उज्जैनकर यांना मानपत्र शॉल व गुलाब बुके देऊन त्यांचा आदर्श माता पिता म्हणुन देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. शिवचरण उज्जैनकर यांना सुसंस्कार करून चांगले संस्कार देण्याचे कार्य त्यांचे वडील श्री मधुकरराव आई सौ. अनुसयाबाई यांनी केले त्याबद्दल उपस्थितानी टाळ्या वाजवून त्यांचा गौरव केला त्याच प्रमाणे संत शिरोमणी नरहरी महाराज ट्रस्ट मुक्ताईनगर तालुक्याचे अध्यक्ष प्रवीण शुरपाटणे यांनी समाजाच्या वतीने डॉ.शिवचरण उज्जैनकर व सौ. संगीताताई उज्जैनकर यांचा शाल व गुलाब बुके देऊन सत्कार केला त्याचप्रमाणे धाराशिव जिल्हा विधी सल्लागार अँड डी.आर. कुलकर्णी व धाराशिव जिल्हा समन्वयक सौ. सरोज कुलकर्णी यांनी सुद्धा डॉ. उज्जैनकर व सौ. संगीता उज्जैनकर यांचा शाल, गुलाब बुके व श्रीकृष्णाचा फोटो फ्रेम भेट देऊन सत्कार केला. यावेळी उज्जैनकर फाउंडेशनच्या 15 वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्याचे खूप खूप कौतुक करण्यात आले. याप्रसंगी बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग दैवज्ञ बुलढाणा जिल्हा समन्वयक बाळूभाऊ ईटणारे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहर पवार शंकरराव अनासुने दिपाली दीपक सोनी सौ. आशा बाई बाळूभाऊ ईटणारे कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर व कार्यकारी सदस्य प्रा. विनायक वाडेकर यांनी केले तर दोघेही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाउंडेशनच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष श्रीमती ज्योतीताई राणे यांनी केले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल