राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गणेश किसनराव केकान यांनी यश प्राप्त केल्याबद्दल आष्टी गावकऱ्यांच्या व भगवान बाबा नगर यांच्या वतीने सत्कार संपन्न

_ यश हे कौतुकास्पद असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामप्रसाद थोरात सर व्यक्त केले

स्वराज्य वार्ता आष्टी प्रतिनिधी राम राठोड<br>ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नसताना राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे त्यामुळे परतुर तालुक्यातील आष्टी येथील गणेश किसनराव केकान यांचे यश हे कौतुकास्पद असल्याचे आष्टी व भगवान बाबा नगर येथील नागरिकांनी व्यक्त केले आहे.

परतुर तालुक्यातील आष्टी येथील गणेश किसनराव केकान यांनी एम पी एस सी परीक्षेत उज्वल यश मिळवल्याबद्दल भगवान बाबा नगर व आष्टी ग्रामस्थांच्या वतेने आष्टी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामप्रसाद थोरात सर आष्टी चे सरपंच मधुकर मोरे सिद्धेश्वर सोळंके ब्राह्मण वाडीचे सरपंच रवि सोळंके हास्तुर तांडाचे सरपंच निर्धास राठोड सिद्धेश्वर केकान नाभिक महासंघाचे आष्टी शहराध्यक्ष गणेश वैद्य भागवत कडपे आष्टी ग्रामपंचायतीचे सदस्य अजर शेख आष्टी ग्रामपंचायतीचे सदस्य उमेश सोळंके आष्टी ग्रामपंचायतीचे सदस्य मुर्तुजा कल्याणकर मोसीन जमींदार सत्तार मास्टर रोहन वाघमारे यांच्या शुभहस्ते गणेश किसनराव केकान यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अशोक घुले राजू अघाव मधुकर कोल्हे आबा केदार अतिक शेख अजर अन्सारी चव्हाण सर तुकाराम काटे सतीश ढोरगे आष्टी मार्केट कमिटीचे अध्यक्ष कृष्णा टेकाळे इनायत काकड रवी शिंदे चोका नाना सौंदर्य बारीकराव चौरे रमेश केंद्रे अशोक कोल्हे गायकवाड सर माऊली चौरे व आष्टीतील अनेक नागरिकांची उपस्थिती होती.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल