स्वराज्य वार्ता प्रतिनिधी:- अहमद अन्सारी पाथरी
मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे हे परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालय समोर प्राणांतिक उपोषणास बसले आहेत. गेली अनेक वर्ष मराठा समाजाच्या मागण्या प्रलंबित असून मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सुटावा या मागणीसाठी महाराष्ट्रातील अनेक संघटनांच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे मराठा आरक्षण गोलमेज परिषद घेण्यात आली यावेळी आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे यांनी मराठा समाजाला आरक्षण व इतर मागण्यांसाठी आपण क्रमांक उपोषण करणार असल्याचे जाहीर केले होते त्यानुसार आज परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते प्राणांतिक उपोषणास बसले आहेत. सरकारने मराठा आरक्षण व इतर मागण्यावर तात्काळ निर्णय घ्यावा . अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यांच्या प्राणांतिक उपोषणास पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील इतर संघटनांचे प्रमुख परभणी येथे येऊन त्यांना समर्थन देत आहेत. या गोलमेज परिषदेसाठी मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक संघटनांचे प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागील झाले होते. गोलमेज परिषदेमध्ये सर्वानुमते पुढीलप्रमाणे ठराव (मागण्या) घेण्यात येऊन आपणांकडे पाठवले होते. प्रमुख मागण्या १) मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत EWS चे आरक्षण मराठा समाजास पुर्ववत चालू ठेवावे. २) निजाम कालीन गॅजेट ग्राह्य धरून मराठवाड्यातील सर्व मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. 3) मुलींप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व मुलांना देखील सर्व शिक्षण मोफत देण्यात यावे. ४) महाराष्ट्रात कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत अशा मराठा समाजाचे ओबीसी आरक्षण रद्द करण्यात येऊ नये. ५) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जाचक अटी रद्द करून कर्ज नाकारणाऱ्या बँकेवर कठोर कार्यवाही करावी. ६) मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी (मुला मुलींसाठी) प्रत्येक जिल्ह्यात वस्तीगृहाची तात्काळ उभारणी करण्यात यावी. ७) मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व शासकीय नोकरी देण्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. ८) छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक लवकरात लवकर उभारावे. सदरील मागण्या मान्य करून घेण्यासाठी ते दिनांक २५/०९/२०२४ पासुन छत्रपती शिवाजी महारांज पुतळा परभणी या ठिकाणी मराठा आरक्षण समन्वय संघर्ष समितीचे अध्यक्ष या नात्याने तर प्राणांतिक उपोषनास बसलेले आहेत. तरी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वरील मागण्या तात्काळ मान्य कराव्यात हि विनंती. सकाळ मराठा समाजाने उद्या दिनांक 25 सप्टेंबर रोजी उपोषण मैदान परभणी येथे ठीक अकरा वाजता यावे असे आवाहन केले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!