नासिक येथे भाग्योदय राष्ट्रीय राष्ट्रीय कवी संमेलनामध्ये कवी मनोहर पवार यांचे काव्य वाचन

नाशिक : अंधार फार झाला एक दिवा पाहिजे । ताई तुझ्या डोळ्यात अंगार पाहिजे ॥ शब्दा सुरांच्या मैफलीत, कवी मनोहर पवार यांनी आपल्या नारीशक्तीचा काव्यजागर केला. रविवार दि. २२ / २०२४ रोजी माहेर मंगल कार्यालय येथे आयोजित ३ रे भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंच व्दारा राष्ट्रीय कवी संमेलनात, निमंत्रीत काव्य मैफलीत कवी मनोहर पवार केळवदकर यांनी ‘ आपल्या, नारी तुझ्या डोळ्यात गं अंगार पाहिजे या ‘ उद्बोधक काव्य उत्कृष्ट रचना सादरीकरण केली . त्यावेळी संमेलनाच्या अध्यक्षा – सुप्रसिद्ध कवियत्री प्रा . सुमती पवार ‘ आणि उदग्घाटक – मा . जेष्ठ कवी चंद्रकांत दादा वानखेडे पूणे आणि आयोजिका कवियत्री मा .सौ . भाग्यश्री बागड आणि संपादक कवी / गायक मा .- प्रमोद सुर्यवंशी आदी हजर होते.

नारीशक्ती पुरस्कार वितरण आणि साहित्य रत्न पुरस्कार वितरण आणि निमंत्रितांचे काव्य संमेलन असे बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन भाग्योदय समुहाच्या संस्थापिका ‘अध्यक्षा मा . सौ. भाग्यश्री बागड आणि आयोजक मा प्रदिप बडदे मुंबई यांनी केले होते .सनई चे बासरीचे मधूर सुर चौघडा या मंगल वाद्य वाजवून कार्यक्रमास सुरुवात झाली . पुरस्कार वितरण नंतर निमंत्रिता चे कविसंमेलन यात महाराष्ट्र राज्यासह गुजरात आध्रा आदी राज्यातून ७०कविंनी सहभाग नोंदविला . यात बुलढाणा चिखली येथून कवी शाहीर, मनोहर पवार यांनी अंधार फार झाला । एक दिवा पाहीजे । घरोघरी आता एक शिवा पाहीजे । या कवितेने रसिकांची दाद मिळाली . आपल्या काव्यात पुढे ते म्हणतात – विनभंग अत्याचार । होई गल्लो गल्ली । सुरक्षित ना कोलकता । मनीपूर दिल्ली । घराघरात आता फुलन झाली पाहिजे । नारी तुझ्या डोळ्यात अंगार पाहीजे। अत्यंत संवेदनशिल आणि महिला संरक्षणा साठी जागृती या गीताने केली .कवी डॉ. मंजूराजे जाधव यांनी ., बाप ‘ ही भावनिक सुंदर कविता सादर केली तर केळवद चे युवा कवी संजय हिवाळे यांनी,”ही नवलाई घामाच्या धारेत । रंग मिसळू दे | रंगाच्या रे षेत । जीवन उसळू दे |” अशी घामाची अस्सल कविता सादर करुन उपस्थित मान्यवरांची दाद मिळवली.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल