स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे
परतुर प्रतिनिधी : धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील आंदोलन कर्ते आंदोलन करत आहेत .यांना पाठिंबा म्हणून दिनांक 23/9/24 वार सोमवार रोजी सकल धनगर जमातीच्या वतीने परभणी जालना महामार्गावरती वाटुर फाटा येथे तीव्र स्वरूपामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . पंढरपूर येथे उपोषणकर्ते यांचा उपोषणाचा आज चौदावा दिवस होता. धनगर समाजाची अनेक वर्षापासूनची मागणी आहे या मागणीचे एक निवेदन मुख्यमंत्री यांना देण्यात आले. देशात कोठेही धनगर जमात अस्तित्वात नाही धनगर यांचा हिंदी उच्चार किंवा लिखाण धनगड असा आहे .धनगर समाज त्यांच्या या संविधानिक हक्कापासून गेली 68 वर्षापासून वंचित राहिलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर ही जमात एसटी प्रवर्गात सामावून घेण्यास कोणतीच हरकत असणार नाही. या मागणीसाठी महाराष्ट्रातील पंढरपूर ,लातूर ,नेवासा या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे .आणि या उपोषणाला पाठिंबा म्हणून . जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाने तात्काळ शासन निर्णय काढून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊन अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे .ही धनगर जमातीची मागणी आहे. उपोषणकर्त्याची प्रकृती ढासळली असून, शासनाने ता त्काळ प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी परभणी जालना वाटुर फाटा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यायात आला या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जवळपास दोन तास चाललेल्या रस्ता रोकोमुळे पाच किलोमीटर चक्काजाम झाले होते. यावेळी धनगर जमातीच्या वतीने शासनाचा निषेध करण्यात आला. धनगर एसटी आरक्षणाचे प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे. तसेच सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात यावी. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सकल धनगर जमातीच्या वतीने देण्यात आला. सकल धनगर जमातीच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे. व तलाठी कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावरील सह्या. हनुमान दौंडे, शिवाजी तरवटे, रंगनाथ येवले,दत्ता कोल्हे, प्रताप कुरधने, बाबुराव गोसावी, सचिन बोंबले, भगवानराव पाटोळे, बानगावडे, नाना डोने, इंद्रजीत घनवट, राधाकिसन माने, दत्ता कुरधने, आदी उपस्थित होते.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!