आष्टी हद्दीत मित्रानेच मित्राचा केला खून आरोपीस ४ दिवस पोलिस कोठडी

स्वराज्य वार्ता / राम राठोड

आष्टी प्रतिनिधी | परतूर तालुक्यातील गोळेगाव येथील घटना बाहेरगावी जाण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांनी काही अंतरावर गेल्यानंतर मद्यप्राशन केले. दोघांत जोराचे भांडण झाल्यानंतर मित्रानेच मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार परभणी जिल्ह्यातील नखाते हतगाव शिवारात घडला. सतीष मनोहर ढवळे ( वय ४०) असे खून झालेल्याचे नाव आहे. गोळेगाव येथील कैलास इंगोले, सतीश ढवळे हे दोघे दुचाकीवरून मानवतकडे निघाले होते. दरम्यान रस्त्यात त्यांनी मद्यप्राशन केले. या वेळी दोघांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर खुनात झाले. कैलास इंगोले याने मित्र सतीश मनोहर ढवळे याचा दगडाने ठेचून खून केला. हा प्रकार १८ सप्टेंबर रोजी घडला होता. पोलिसांनी शुक्रवारी कैलास याला बीडमधून ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल