स्वराज्य वार्ता / राम राठोड
आष्टी/प्रतिनिधी : अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी चालू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आल्याने रविवारी (दि.२२) रोजी आष्टी बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे. या संदर्भात शनिवारी सकल मराठा समाज आष्टी व कोकाटे हादगाव सर्कलच्यावतीने आष्टी पोलीस ठाण्यास निवेदन देण्यात आले. अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांची तब्येत अत्यंत खालावल्याने सरकारने तातडीने दखल घ्यावी यासाठी जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदच्या समर्थनार्थ आष्टी बंदमध्ये आपली दुकाने बंद ठेवून व्यापारी बांधवांनी सहकार्य करावे अशी आवाहन करण्यात आले आहे. या वेळी मराठा समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






