परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील युवकांचा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांना पुन्हा विधानसभेत पाठवण्याचा निर्धार

पाकणी येथील युवकांचा राहुल लोणीकरांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश

परतूर/प्रतिनिधीहनुमंत दवंडे

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याची चिन्हे दिसत असतांना सर्वच राजकीय पक्षाकडून आपला उमेदवार कसा निवडून येईल याकडे जास्त भर दिला असल्याचे बोलले जात आहे सोबतच युवकांना आकर्षक करून आप आपल्या पक्षात गटात घेण्यासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. या उलट परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील युवक हे स्वतः भाजपचे माजी मंत्री विद्यमान आमदार बबनराव लोणीकर व भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा मतदार संघात सर्वच क्षेत्रात झालेल्या चौफेर विकास कामांमुळे प्रभावित होऊन पक्ष प्रवेश करत आहे. मंठा तालुक्यातील पाकणी येथील युवकांनी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्यावर विश्वास ठेऊन भाजपचे कार्यकर्ते शुभम आढे व प्रमोद राठोड यांच्या पुढाकाराने अनेक युवकांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश केला राहुल राठोड,सुरेश चव्हाण, माजी सरपंच राहुल चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन राठोड, ग्रामपंचायत सदस्य गणेश,भोसले रवी राठोड, नितीन राठोड,महादेव राठोड, योगेश राठोड,कैलास पवार, देविदास राठोड,राजू राठोड, अर्जुन राठोड,विष्णू राठोड, भिमा चव्हाण,रंजीत चव्हाण, अमोल खारवणे,सचिन राठोड,दत्ता चव्हाण,समाधान राठोड,आर्यन खंदारे,रमेश राठोड यांच्यासह अनेक युवकांनी पक्ष प्रवेश केला यावेळी भाजयुमो तालुका अध्यक्ष बंडू मानवतकर, बाळासाहेब पवार,सुरेश जगताप,दामोदर आवटे, तुकाराम माटे,मानवतकर बापू,संदीप तनपुरे यांच्यासह अन्य मान्यवरांनी युवकांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी पाकणी येथील युवकांनी सांगितले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर व भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांनी मतदार संघात केलेल्या चौफेर विकास कामामुळे प्रभावित होऊन पक्ष प्रदेश केला असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अहोरात्र परिश्रम करून केलेल्या विकास कामांना जनसामान्य जनते समोर ठेऊन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना पुन्हा विधानसभेत पाठवणार असल्याचे यावेळी पाकणी येथील युवकांनी बोलतांना सांगितले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल