पुंडलिकनगर पो. ठाण्याचा फरार पो.नि. राजेश सुदाम यादवचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला.

संपादकाच्या फिर्यादीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला होता गुन्हा दाखल.

छत्रपती संभाजीनगर दैनिक बुलंद शक्ती न्युज नेटवर्क.

छत्रपती संभाजीनगर शहरातील वादग्रस्त ठरलेल्या पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचा लाचखोर पोलिस निरीक्षक राजेश सुदाम यादव याने दैनिक बुलंद शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्या कडून पन्नास हजार रुपयांची लाच घेतली होती.
मौजे गारखेडा परिसरातील रेणुका नगर ता.जि. छत्रपती संभाजीनगर येथे गट नं. 50/2/4 मध्ये 24000 स्के. फुट जागा फिर्यादी रामेश्वर दरेकर यांची आहे. या जागेचे न्यायालय औरंगाबाद येथील 6 वे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर यांच्या न्यायालयाने दि.01/02/2024 रोजी सदरील मिळकती बाबत निरंतर (कायम) मनाई हुकूमेचा आदेश रामेश्वर दरेकर यांच्या बाजूने पारीत आहे. ज्याचा नियमीत दावा क्रं. 535/2017 असुन . सदर मिळकती मध्ये कमल मोहन चव्हाण, नातेवाईक व इतर गुंड लोकांनी येऊ नये असे कोर्ट आदेशात नमुद
‘आहे औरंगाबाद येथील 6 वे सह-दिवाणी न्ययाधीश (वरिष्ठस्तर), श्री. डी. एस. खेडेकर यांनी दि. 01/02/2024 रोजी म न्यायालयाचा निकाल पारीत झालेला आहे. त्याअनुषंगाने फिर्यादी यांनी दि. 18/03/2024 रोजी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात मौजे गारखेडा ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथील गट क्र. 50/2/4 मधील ज्याचे क्षेत्रफळ 24000 हजार स्के. फुट यावर माझा मालकी व ताबा आहे. दि. 18/03/2024 रोजी माझ्या मालकी व ताब्यातीलं जागेवर गेलो असता आजुबाजूच्या मोहन चव्हाण व इतर गुन्हेगार लोकांनी जागेवर येण्यास प्रतिबंध केला, शिवीगाळ केली, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस संरक्षण मिळण्यासाठी विनंती अर्ज केला होता. मात्र लाचखोर भिकेचे डोहाळे लागलेल्या यादवने चक्क संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्या कडून पन्नास हजार रुपये लाच घेतली. दरेकर यांनी न्यायालयाने तिन आदेश पारित असताना देखील हा पोलिस निरीक्षक राजेश सुदाम यादव पैसे मागतोय हि बाब खटकली लाच देता वेळी व्हिडिओ चित्रीकरण केले,एक लाख रुपये काम झाल्यावर द्यायचं हे ठरलं काम चार महिने होऊन होत नसल्याने अर्जदार रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी दिलेली रक्कम परत करण्याबाबत विनंती केली यांवर लाचखोर पोलिस निरीक्षक राजेश सुदाम यादव यांनी दोन टप्प्यांत रक्कम देतो असे सांगितले, पोलिस चालक सुरेश पवार हे देखील यात सामील होते या दोघांवर देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नागरे पाटील यांच्या आदेशानुसार पोलिस अधीक्षक संदीप आटोळे यांनी तसेच पोलिस उप अधीक्षक राजीव तळेकर यांनी फिर्यादी रामेश्वर दरेकर यांच्या फिर्यादीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

कशासाठी मागितली होती पो.नि यादवने लाच.

पोलीस निरीक्षक, राजेश यादव यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे अर्ज दाखल करुन तेथुन लेखी पत्र आणा बंदोबस्त कार्यालयीन काम करणारे एस.ए. उगले यांच्याकडे चौकशी कामी अर्ज पोलीस निरीक्षक, राजेश यादव यांनी वर्ग केला. तसेच पोलीस निरीक्षक, राजेश यादव यांच्या पोलीस गाडीवर चालक सुरेश पवार पोलीस कर्मचारी यांनी पोलीस निरीक्षक राजेश यादव यांच्यात दि. 18/03/2024 रोजी झालेल्या चर्चेनुसार सुरुवातीला पन्नास हजार रुपये दयावे लागतील काही दिवसांनी साडेचार लाख रुपये जस-जसे काम तपास सुरु होईल तसे दयावे लागतील. तसेच बंदोबस्त मिळाल्यानंतर पाच लाख रुपये दयावे असे एकुण दहा लाख रुपये दयावे लागतील असे
असे सांगितले, फिर्यादी यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे दि. 01/04/2024 पोलिस बंदोबस्त मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. पोलिस
आयुक्त कार्यालयाकडून जा.क्रं. कक्ष-5(1)/ पोलीस संरक्षण/2024/5701 दि. 01/04/2024 अन्वये पुंडलीकनगर पोलीस ठाण्याच्या नावाने सशुल्क तत्वावर पोलीस संरक्षण मिळणे बाबत लेखी पत्र दिले.
मात्र पो.नि राजेश यादव यांनी पोलिस बंदोबस्त मिळण्यासाठी आपला अहवाल पोलिस आयुक्त यांच्या कडे पाठवला नाही. फिर्यादी रामेश्वर दरेकर यांनी
दिनांक 25/06/2024 रोजी पोलीस अधीक्षक साहेब, लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय छ. संभाजीनगर येथे पोलीस निरीक्षक, राजेश यादव व चालक सुरेश पवार यांचे विरुध्द रितसर चौकशी कामी तक्रारी अर्ज दिला यासोबतच व्हिडिओ चित्रीकरण केलेलं लाचेची सगळे व्हिडिओ दिले यात पोलिस निरीक्षक राजेश यादव, पोलिस चालक सुरेश पवार सगळी लाचखोरी दिली गेली.

संपादकांनी केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणामुळे गुन्हा दाखल.

आजपर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सापळा रचून रंगेहाथ पकडून कारवाई केली गेली मात्र हि कारवाई जरा धक्कादायक ठरली आहे. स्वतः सापळा संपादक यांनी रचला रंगेहाथ पोलिस निरीक्षक राजेश यादव तसेच पोलिस कर्मचारी चालक सुरेश पवार यास आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ चित्रीकरण करून रंगेहाथ पकडले. अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नागरे पाटील यांनी भुमिका घेऊन लाचखोर पोलीस निरीक्षक राजेश यादव विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. फिर्यादी यांनी दि.
03/04/2024 वार बुधवार रोजी रात्री 08.21 वाजता पोलीस स्टेशन पुंडलीकनगर ईमारतीच्या समोरील उत्तर दिशेला असलेल्या छोट्या चौरसस्त्यावर व्हिडिओ चित्रीकरण केले यात रक्कम पन्नास हजार रुपये चालक पोलिस पवार कडे दिले हे व्हिडिओ चित्रीकरण मध्ये दिसत आहे. दुसर्या व्हिडिओ मध्ये काम न झाल्याने दिलेली रक्कम मागितली असता दोन टप्प्यांत देतो पंचवीस पंचवीस अशी कबुली पो.नि. राजेश यादव चालक पवार यांच्या समोर फिर्यादी यांना देतात .याचे व्हिडिओ चित्रीकरण देखील फिर्यादी यांनी केले आहे . गुन्हा दाखल होताच फरार झालेल्या दोन्ही आरोपी राजेश सुदाम यादव, सुरेश पवार यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.एम . जमादार यांनी अटकपूर्व जामीन नामंजूर केला आहे. न्यायालयाने दिलेल्या अटकपूर्व जामीन नामंजूराचे सर्वत्र कौतुक पहायला मिळाले, फिर्यादी रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी देखील न्यायालयाच्या निदर्शनास सत्य परिस्थिती लक्षात आणून दिली, फिर्यादी रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्या बाजूने कायदेशीर सल्लागार गजानन तायडे यांनी भक्कम बाजु मांडली युक्तिवाद अचुक मांडला यामुळे न्यायालयाने याबाबत गंभीर होत अटकपूर्व जामीन फेटाळला. पोलिस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक राजीव तळेकर यांनी देखील न्यायालयात आपले म्हणणे सविस्तर दाखल केले जामीन मिळाला तर काय परिणाम होऊ शकतो याचा पाढा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उप अधीक्षक राजीव तळेकर यांनी तसेच पोहेको प्रकाश घुगरे यांनी न्यायालयास वाचुन दाखवला, आरोपी राजेश सुदाम यादव यांच्या तर्फे विधी तज्ञ म्हणून घाणेकर यांनी बाजू मांडली . सरकारी वकील यांनी देखील आरोपी राजेश सुदाम यादव यास जामीन मिळाला कायदा सुव्यवस्था प्रश्न उद्भवु शकतो , घटने बाबतीत व्हिडिओ चित्रीकरण सबळ पुरावे उपलब्ध आहेत यामुळे अटकपूर्व जामीन नामंजूर केलाच पाहिजे असे रोखठोक प्रश्न उपस्थित केले यामुळे जामीन नामंजूर केला गेला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या भुमिका ठरली महत्वाची.

अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नागरे पाटील यांच्या आदेशानुसार पोलिस अधीक्षक संदीप आटोळे यांनी तसेच पोलिस उप अधीक्षक राजीव तळेकर यांनी सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. सापळा अधिकारी म्हणून राजीव तळेकर पोलिस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी नगर तसेच मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, सुरेश नाईकनवरे पोलिस उप अधीक्षक, सापळा पथक,पोहे , प्रकाश घुगरे, अशोक नागरगोजे,पोअ,सि.एन . बागुल, यांनी कारवाई यशस्वी केली.

न्यायालयाचे सर्व पत्रकार,लाचलुचपत विभागाचे रामेश्वर दरेकर यांनी मानले आभार.

एका जबाबदार अधिकारी याने चक्क संपादक यास लाच मागणे म्हणजे जंगलात राहुन वाघा बरोबर लढा देणे. मात्र हि बाब संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर यांना अमान्य होती व्हिडिओ चित्रीकरण करून फरार आरोपी राजेश सुदाम यादव याचा सगळा पराक्रम चव्हाट्यावर आणताच याची दखल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नागरे पाटील यांनी घेत चौकशी करून थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश फिर्यादी रामेश्वर दरेकर यांच्या तक्रारीवरून पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांना दिले, तपास अधिकारी राजीव तळेकर यांनी देखील क्षणाचा विलंब न करता थेट पुंडलिकनगर गाठत गुन्हा दाखल केला. सर्व इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे तसेच प्रिंट मिडिया यांनी आपल्या वर्तमानपत्रांतून प्रसिद्धी दिली. फरार आरोपी राजेश सुदाम यादव याने चालक सुरेश पवार यानी अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालय येथे दाखल केला जिल्हा व सत्र न्यायाधीश एन एम जमादार यांनी अटकपूर्व जामीन नामंजूर केला. यामुळे रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी सगळ्यांचे आभार मानले आहेत. दोन पोलिस कर्मचारी देखील पुन्हा याच प्रकरणात आरोपी होणार हि धक्कादायक माहिती रामेश्वर दरेकर यांनी दिली आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल