गोळेगाव येथे साठ विविध जाती समूहातील तरुणाने केले रक्तदान 

 राजाधिराज गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी /- राम राठोड 

आष्टी(प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या मौजे गोळेगाव येथे गणेशोत्सवा निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल साठ तरूणांने रक्तादान केले असून येथील राजाधिराज गणेश मंडळाकडून अतिशय स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला असून याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की परतूर तालुक्यातील मौजे गोळेगाव येथे मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे, येथील राजाधिराज गणेश मंडळा कडुन एक स्तुत्य उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले होते, जालना येथील जनकल्याण रक्तपेढि यांच्याशी संपर्क साधून चर्चा करण्यात आली आणि रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान या युक्तिप्रमाणे जालना वैद्यकीय सेवा प्रतिष्ठान संकलित जनकल्याण रक्तकेंद्र याना बोलावून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले यावेळी तब्बल विविध जाती समूहातील तरुननि यात सहभाग नोंदवून तब्बल साठ तरुणाने स्व इच्छेने रक्तदान केले राजाधिराज गणेश मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश तौर उपाध्यक्ष अजय शेटे व त्यांच्या कमिटीने हा उपक्रम हाती घेऊन एक चांगला संदेश आणि लोकोपयोगी कार्य केले आहे त्यांच्या या कार्याचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.

जालना येथील जनकल्याण रक्तपेढीचे जनसंपर्क प्रमुख वंदना शेळके सह सचिन त्रिवेदी,रेखा व्यहालकर,संजय महाजन,जाणकिराम खरात,राजेश्वरी बिंगी, आदी कर्मचारी यांनी यावेळी मदत केली,रक्त दात्यामध्ये एकूण साथ तरुण सहभागी झाले होते अंकुश गोरे,अवेज फेरोज खान,दिगंबर कोल्हे,शेख शकील बाशा,अमर पठाण,वशिम पठाण,अजय शेटे,गंगाधर घुंगासे,विष्णू गुंजकर,लक्ष्मण तौर,राजेभाऊ घोरड यांच्या सह अनेक सर्व जाती धर्माच्या तरुणांनी यावेळी रक्तदान केले,गोळेगाव येथील हा स्तुत्य उपक्रम लोकांना प्रेरणादायी असेल असे असे मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश तौर यांनी सांगितले यावेळी यावेळी तुकाराम गुंजकर,अविनाश मोहळे,भाऊराव वायाळ,शेळके यांनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल