स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे
परतूर प्रतिनिधी : पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे.एक वृक्ष लावुन जन्मदिवस साजरा करुया वृक्ष मोठा होई पर्यंत त्या वृक्षाचे संगोपन करुया तरच आपल जिवन अमुल्य प्रदुषण मुक्त होईल व शुध्द हवा मिळु शकेल. आक्सीजन मोठ्या प्रमाणात मिळेल. वृक्षारोपण वृक्षसंवर्धन “एक वृक्ष आरोग्य स्वस्थ” चला आज पासून संकल्प करुया एक वृक्ष लावुन जन्मदिवस साजरा करुया पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करुया. ही संकल्पना घेऊन श्रीराम फाउंडेशन च्या वतीने भगवान पाटोळे सामाजिक कार्यकर्ते तथा शालेय समिती सदस्य यांच्या वाढदिवसानिमित्त रोपटे लावून वाढदिवस साजरा केला.जन्मदिनाच्या दिनाच्या सर्व सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्षेत्रातील, मित्र परिवारांनी शुभेच्छा दिल्या यावेळी राहुल काळे, गोविंद काळे,अशोक वाघमारे , महादेव कांबळे, राजेश गाते, योगेश टोणपे व सर्व जिल्हा परिषद शिक्षकवृंद यावेळी उपस्थित होते.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






