शासकीय ओद्यौगिक प्रशिक्षण संस्था ( रोहिणा बुद्रुक ) येथाल शिक्षकांचा मनमानी कारभार

शिक्षक वेळेवर उपस्थीत राहात नसल्या बाबत उपविभागीय अधिकारी परतुर यांना निवेदन सादर.

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे

परतूर प्रतिनिधी : शासकीय आद्यौगिक कॉलेज, रोहिणा बु. या ठिकाणी आय. टी. आय. या ट्रेड चे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी-विद्यार्थीनी असून येथे सहा प्रकारचे ट्रेड चे प्रशिक्षण दिले जाते, या ठिकाणी एकूण ११ शिक्षक कार्यरत असून त्यातील मोजकेच शिक्षक दररोज हजर असतात. या कॉलेज चे प्रार्चाय राजेश धानोरकर हे असून हे कधीतरी कॉलेजला महत्वाचे काम असल्यास येऊन जातात पुर्ण वेळ कॉलेज मध्ये नसतात. या कॉलेमध्ये CCTV कॅमेरे बसविले नसल्यामूळे बदलापूर सारखे अनुचीत प्रकार घडण्याची शक्यता नाकारत येत नाही, त्यामुळे या ठिकाणी त्वरीत CCTV कॅमेरे बसविण्यात येऊन शिक्षकांच्या हजेरीसाठी बायोमेक्ट्रीक प्रणालीचा अवलंब करण्यात येऊन त्यांची हजेरी घेण्यात येणे न्याय व गरजेचे आहे. आज पर्यंत या शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत कोणतेही शिक्षक वेळेवर येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच या सर्व बाबींची तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन अथवा अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा भगवान पाटोळे शालेय समिती उप अध्यक्ष रोहीना बु.यांनी दिला आहे होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी प्राचार्य व प्रशासनाची राहील असे दिलेल्या तक्रारी निवेदनात म्हटले आहे.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल