आष्टी सह परिसरात मुसळधार पाऊस

सावरगाव, कुंभारवाडी सह अनेक गावांचा संपर्क तुटला

स्वराज्य वार्ता / सुनील गायकवाड

आष्टी प्रतिनिधी : परतूर तालुक्यातील आष्टी परिसरात काल शनिवार पासुन सुरु असलेल्या मुसळधार पाऊसामुळे नदीवर बांधलेल्या पुलाची उंची कमी असल्याने पुर आला आहे. त्यामुळे सावरगावसह कुंभारवाडी या गावाचा संपर्क तुटल्याने गावकऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, आष्टी येथुन जवळच असलेल्या सावरगाव आणि लोणी सावंगी रस्त्याच्या बाजुला वसलेले साधारणता शंभर कुटूंबे असलेले कुंभार वाडी या दोन्हीही गावाच्या जवळुन गेलेल्या नद्यांना पूर आला आहे. नदीवरील नळकांड्याच्या पुलाची उंची अतिशय कमी असल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. पोळा सणाच्या एक दिवस अगोदर हा संपर्क तुटल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. बाजारात जाऊन सणासुदीचे सामान खरेदी करुन येणारे लोक बाहेर अडकल्याची माहिती गावकऱ्यांकडून मिळाली आहे. काही लोक पाण्यातुन पोहून आल्याचे देखील सांगण्यात आले आहे. या दोन्ही गावाच्या पुलांच्या उंचीमुळे दरवर्षी येथील नागरिकांना पावसाळ्यात आशा अडचणीचा सामना करावा लागतो. या गावांचा वारंवार संपर्क तुटत असल्याने येथील लोकांत पावसाळ्यात कायम भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झालेले असते. पावसाळ्याचे दिवस असल्याने येथे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या महिलेला प्रसुती वेदना निर्माण झाल्या किंवा कुणाला आरोग्य सेवा घेण्याची गरज भासली किंवा अन्य काही समस्या उद्भवली तर जाण्याचे मार्ग बंद झालेले असतात, अशी माहिती गावकऱ्यांच्यावतीने देण्यात आली आहे. वेळीच उपाय-योजना करुन सदरील ठिकाणी असलेल्या पुलाची उंची वाढवण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. आज दिवसभर आष्टीसह परिसरात जोरदार पाऊस पडला असुन अनेक ठिकाणी नदी नाले ओसंडून वाहत आहेत.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल