फक्त तुझ्याच आठवणी

गार गार वार्‍याने, मला वाटेत गाठले.

तुझ्या आठवणींचे ढग, मग माझ्या मनात दाटले.

नाही म्हणता म्हणता, सारे आभाळ बरसले.

तुझ्या आठवणीनी, माझे भान हरपले.

पावसाच्या प्रत्येक थेंबाने, मला चिंब भिजवले.

तुझ्या प्रत्येक आठवणीनी, जणू मला बिलगले.

भिजत भिजत मी, एका आडोशाला गेले.

तिथे तुझ्या आठवणीनी, मला आपलेसे केले.

सांगत होते पावसाला, मला घरी जाउ दे.

तुझ्या आठवणींत, मला वाहून जाउ दे.

पावसाने माझे, न ऐकण्याचे ठरवले.

मग तुझ्या आठवणीनीच, मला सावरायचे ठरवले.

असे मला पावसाने, भर वाटेत गाठले.

तुझ्या आठवणींचे क्षण, माझ्या डोळ्यांत साठले.

जाता जाता पावसाने केली, एका जोरदार सरीची पाठवणी.

काय सांगू तुला, त्या सरीत देखील होत्या,

फक्त तुझ्याच आठवणी….

 

कवी :- अमन प्रधान

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल