योग, ध्यान ,व्यायाम व प्राणायामाचे अमृततुल्य फायदे

स्वराज्य वार्ता /  किरण पाटील

योग, ध्यान, प्राणायाम, आसन, व्यायाम, सूर्यनमस्कार इतर सर्व प्रकार हे आपल्या शरीर आणि मन सुंदर आणि आनंदी, प्रफुल्लीत ठेवण्याचं फार मोठे मार्गदर्शक गुरुकिल्ली आहे. आपली भारतीय संस्कृती परंपरा, फार मोठी आहे आपल्याला फार मोठा वारसा योग, ध्यान आणि प्राणायाम याचे लाभलेला आहे प्राचीन काळात ऋषीमुनी योग, ध्यान प्राणायाम यावर त्यांची दिनचर्या असायची पूर्वी संपूर्ण जंगल भाग असल्याने एखाद्या झाडाखाली ऋषीमुनी तपश्चर्या करणारे साधुसंत योगधानेच्या माध्यमातून आपले ध्यान ईश्वराकडे केंद्रित करायचे व त्यामधून त्यांना एक वेगळ्या प्रकारची जीवन ऊर्जा प्राप्त व्हायची त्यामुळेच ते शेकडो वर्ष अनेक वर्ष तपश्चर्येमध्ये लिन व्हायचे त्या माध्यमातून नवीन ऊर्जा प्राप्त करायचे जसे चांगदेव महाराज अनेक वर्ष तपश्चर्या करून नंतर जागृत व्हायचे आणि त्यांना एक वेगळ्या प्रकारची नवीन ऊर्जा प्राप्त व्हायची भगवान महावीर व भगवान गौतम बुद्ध हे सुद्धा योग ध्यानामध्ये तासन्तास, अनेक वर्ष ते बसायचे सांधिपणी ऋषींनी तपश्चर्याचे अनेक मार्ग फायदे सुद्धा सांगितलेले आहेत. स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, सुभाष चंद्र बोस, महात्मा गांधी हे सुद्धा ध्यान साधनेचेच उपासक होते त्यातून त्यांना चांगली ऊर्जा प्राप्त होऊन ते देशकार्यासाठी लढत राहिले नामवंत कुस्ती पटू दारासिंग हे सुद्धा योग, ध्यान व प्राणायाम सतत करायचे नुकतेच योग ऋषी रामदेव बाबा व बाळकृष्णजी यांनी सुद्धा योग, ध्यान व प्राणायामाचे महत्व जगाला पटवून दिले. त्या माध्यमातून अनेक लोक योगध्याना कडे वळलेले आपल्याला दिसतात आजच्या धका धकीच्या जीवनामध्ये अनेक आजार, व्याधी आपल्याला दिसतात त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी व आपल्या स्वतःसाठी तरी त्या गोष्टी काळजीपूर्वक केल्या पाहिजेत  शालेय स्तरावर सुद्धा विद्यार्थ्यांचे मन, बुद्धी, शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगाचे धडे घेतले जातात नुकताच आनंदी शनिवार हा दिवस सुद्धा योग, ध्यान, प्राणायाम, व्यायाम प्राणायाम घेऊन साजरा केला जातो ही एक प्राचीन जीवन पद्धती आहे आपले मन ,बुद्धी, शरीर तंदुरुस्त व एकाग्र ठेवण्यासाठी योग,ध्यान,व्यायाम , प्राणायामाचे महत्त्व अनन्य साधारण आहे त्यासाठी घरातील सर्व ज्येष्ठ बाल, किशोर, युवा यांनी योग, ध्यान, व्यायाम, प्राणायामाकडे लक्ष देऊन त्यासाठी दररोज थोडा वेळ द्यावा आज आपण आठ, आठ ,बारा, बारा तास काम करणारे कर्मचारी बंधू-भगिनी बघतो ते तासंतास कॉम्प्युटर समोर बसून काम करतात या सर्वांनाच योग, ध्यान, व्यायाम, प्राणायामाची नित्तांत आवश्यकता आहे आपल्या कामामध्ये आपल्याला थकवा जाणवणार नाही तर मन ,शरीर प्रसन्न राहील म्हणून या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष देऊन ती अमलात आणावी. खरोखरच हे योग, ध्यान, व्यायाम व प्राणायामाचे अमृततुल्य फायदे आहेत आपल्याला धका, धकीच्या जीवनात वेळ मिळत नाही परंतु प्रत्येकाने सकाळी अर्धा ते एक तास तरी योग, ध्यान व प्राणायामासाठी देणे काळाची गरज आहे त्यामुळे आपले शरीर, मन, बुद्धी स्थिर आणि एकाग्र आनंदी राहील मी स्वतः गेल्या १५ वर्षापासून रामदेव बाबांच्या योगाचे आस्था टी.व्ही. चॅनलवर बघून योग, प्राणायाम करत असतो त्यामुळे मला स्वतः सतत कामामध्ये व्यस्त असलो तरी कुठल्याच प्रकारचा थकवा जाणवत नाही हे माझे स्वतःचे उदाहरण आपल्यासमोर ठेवतो आणि थांबतो धन्यवाद.

लेखक.. डॉ. शिवचरण मधुकर उज्जैनकर

संस्थापक अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तथा ज्येष्ठ शिक्षक नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी ता. मुक्ताईनगर जि. जळगाव मो. नंबर ९१५८७२६४४८

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल