निमखेडी केंद्राची माहे ऑगस्ट 2024 या महिन्यातील शिक्षण परिषद संपन्न

स्वराज्य वार्ता / किरण पाटील

जळगाव : शुक्रवार दि.30/08/2024 रोजी जि.प.शाळा डोलारखेडा ता. मुक्ताईनगर येथे निमखेडी केंद्राची माहे ऑगस्ट 2024 या महिन्यातील शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाची प्रस्तावना श्री अविनाश आव्हाड सरांनी केली. प्रथम शिक्षण परिषदेची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आपल्या तालुक्याचे आदरणीय गटशिक्षणाधिकारी श्री मदन मोरे साहेब मुक्ताईनगर व प्रमुख पाहुणे श्री केंद्रप्रमुख भोईदादा, श्री दानी सर मुख्याध्यापक महासंघ संपादक, श्री महेंद्र मालवेकर विषय तज्ञ मुक्ताईनगर यांनी भूषवले. सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून शिक्षण परिषदेला सुरुवात करून मोलाचे मार्गदर्शन खालील मान्यवरांनी केले.मा.श्री भोई दादा यांनी शाळेतील शैक्षणिक विकासावर मार्गदर्शन केले.माननीय श्री दाणी सर यांनी शिक्षकांना शिकवताना किती काळजी घ्यावी व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी कशाप्रकारे शिक्षकांनी मेहनत घ्यावी. यावर मार्गदर्शन केले.आदरणीय गटशिक्षणाधिकारी मोरे साहेब यांनी विद्यार्थ्यांचे सुरू असलेले सर्व उपक्रमांसह त्यांची शैक्षणिक गुणवत्ता व अध्ययन क्षमता निपुण कशा होतील याबाबतीत मार्गदर्शन केले. शिक्षण परिषदेतील चर्चा विषय खालीलप्रमाणे – विषय क्र.1 कार्यक्षमता प्रतवारी दर्शके विश्लेषण व उपाय योजना या विषयावर श्री विकी कुटे सर इच्छापुर सरांनी मार्गदर्शन केले. विषय क्र.2 – अध्ययन निष्पत्ती निहाय प्रश्न निर्मिती व अध्ययन अध्यापन(भाषा) श्री इंगळे सर इच्छापुर यांनी मार्गदर्शन केले. विषय क्र 3 आदर्श नमुना पाठ इयत्ता – 4 थी विषय भाषा मिठाचा शोध हा पाठ उत्कृष्टपणे सादर केला. विषय क्र 4- शैक्षणिक ग्रामसभा प्रक्रिया-प्रभावी अंमलबजावणी श्री बनसोड सर टाकळी यांनी मार्गदर्शन केले. स्थानिक पातळीवरील विषय व आयत्या वेळेवर चे विषय श्री गणेश कोळी प्रभारी केंद्रप्रमुख यांनी हाताळले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी केंद्रप्रमुख श्री गणेश कोळी सर यांनी तर आभार श्री अविनाश आव्हाड सर यांनी केले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल