जिल्हा परिषद शाळेतील विविध स्पर्धेतील विजेत्यांचा गुणगौरव सोहळा 

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इंगेवाड

खेळामुळे शरीर सुदृढ आणि निरोगी राहते – सचिन इंगेवाड 

स्वराज्य वार्ता / राम राठोड 

आष्टी प्रतिनिधी :- आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आलेले आहे.यासोबतच सुदृढ ,निरोगी आरोग्य ही गरजेचे आहे.सुदृढ,निरोगी आरोग्य राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खेळात सहभाग घेतला पाहिजे असे प्रतिपादन आष्टी पोलिस ठाण्याचे सपोनी सचिन इंगेवाड यांनी केले. परतुर तालुक्यातील आष्टी येथील जिल्हा परिषदेतील चार विभागांतील ग्रुप ए व ग्रुप बि गटात १५ ऑगष्ट निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना पत्रकार संघाच्या वतीने स्तुती चिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी इंगेवाड बोलत होते.

प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी व्यासपीठावर शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश ढवळे, केंद्र प्रमुख राम सोळंके, मुख्याध्यापक रत्नाकर कुलकर्णी, अनिल डोंगरे, मिर्झा कलिम बेग,दत्तात्रय घुले, डॉ अजगर जमिनदार यांची उपस्थिती होती.इंगेवाड म्हणाले विद्यार्थ्यांनी नेहमी खेळात सहभाग घ्यावा खेळामुळे शरिराला व्यायाम मिळतो.मन प्रफुल्लित राहते.शरिर सुदृढ, निरोगी आरोग्य असलेली मुले शिक्षणात इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत नेहमी पुढे राहुन आपले ध्येय प्राप्त करतात.विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच, ट्रॅफिकचे नियम, पोक्सो कायद्याविषयी विविध उदाहरणे देत त्यांनी या जिल्हा परिषद शाळेतील राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.

सुत्रसचालन विष्णू सोळंके यांनी तर आभारप्रदर्शन सय्यद जकाऊल्ला यांनी केले.विविध स्पर्धेतील या विद्यार्थ्यांचा झाला सन्मान जिल्हा परिषद प्रशालेतील – वक्तुत्व स्पर्धा (गट ए) जवेरिया सय्यद,साक्षी काकडे,अनिता पवार (गट बि) साद कुरेशी, अशोक थोरात,युवराज शिंगारे. जिल्हा परिषद केंद्रीय नुतन कन्या – रांगोळी स्पर्धा (गट ए) ईश्वरी महाजन,वैदिका घांडगे, कल्याणी गांजाळे (गट बि)दुर्गा जगदाळे, समृद्धी सोळंके,रोहीनी गाडेकर. जिल्हा परिषद नुतन ऊर्दू – वक्तुत्व स्पर्धा (गट ए) जमिनदार रुखिया, जमिनदार काब अली, कल्याणकर अलिना.(गट बि) तांबोळी कामरान, कुरेशी अरफान,मनियार सानिया. जिल्हा परिषद नुतन मराठी – सुंदर हस्ताक्षर (गट ए) कृष्णा गांजाळे, समर्थ आगलावे,हादी कुरेशी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल