परतूर तालुक्यात अनेक बड्या नेत्यांच्या आष्टी येथे काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

काँग्रेसच्या वतीने खा. कल्याण काळे यांचा मा.आ.धीरज देशमुख यांच्या उपस्तिथीत आष्टी येथे नागरी सत्कार 

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे

परतूर /प्रतिनिधी : मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांच्या पुढाकारातून आज दिनांक 30 आगष्ट रोजी जालना जिल्ह्याचे नवनिर्वाचित खा.कल्याण काळे याचा परतूर, मंठा, नेर, सेवली मतदार संघ काँग्रेस च्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील आष्टी मोरंगेश्वर मंगल कार्यालयात संपन्न होणाऱ्या या सोहळ्यास अनेक बड्या स्थानिक व्यक्तींचा काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश होणार असून या प्रवेश सोहळ्यास माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे चिरंजीव तथा लातूरचे आ. धीरज देशमुख यांची प्रमुख उपस्तिथी राहणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून, जालना काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष राजेंद्रजी देशमुख, आ. कैलास गोरंट्याल,मा. आ.नामदेवराव पवार,राजेंद्र राख,शेख महेमूद, कल्याण दळे असल्याची माहिती काँग्रेस चे तालुका अध्यक्ष बाबासाहेब गाडगे यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली आहे. मा.आ.सुरेशकुमार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत यावेळी सिद्धेश्वर पाटील सोळंके (भाजप जिल्हा उपाध्यक्ष व माजी सभापती कृ. उ. बा. स. आष्टी) , प्रफुल्लआबा शिंदे आनंदगाव, हबीब भाई आष्टी, कदिर भाई आष्टी, अमर अशोकराव सोळंके लि.पिंप्री, विनोद थोरात (भाजप आष्टी शहराध्यक्ष), कमळाजी आगलावे आष्टी,मंगेश वाघमारे आष्टी, रमेश बडवणे आष्टी, अमर देशमुख ब्राम्हणवाडी, श्रीमंत चौधरी लि. पिंप्री,अजय मालघन लि. पिंप्री,लक्ष्मण सोळंके कार्हळा, सुनिल सोळंके कार्हळा, सोना बापू सोळंके कार्हळा, गजानन सोळंके ब्राम्हणवाडी, यमुदादा सोळंके ब्राम्हणवाडी, संदिप ढवळे को. हदगांव,नवनाथ मिठे पांडे पोखरी, संतोष जगताप पांडे पोखरी, विलास जगताप पांडे पोखरी, अनिल जाधव परतवाडी, जगन्नाथ आढे हस्तूर तांडा, यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश होणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकात दिली आहे. दरम्यान या नागरी सत्कार व प्रवेश सोहळ्यास मोठ्या संख्येने काँग्रेस च्या आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी उपस्तिथ राहण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल