वारंवार खेटा मारूनही अपंगांवर होतोय अन्याय.
स्वराज्य वार्ता / पी डी सोळंके
<br>मंठा : मंठा तालुक्यातील विडोळी खु. येथील दिव्यांग कु. जीवन बालासाहेब कदम हा अत्यंत सामान्य मोलमजूरी करून ऊदरनिर्वाह करणार्या कुटुंबातील मुलगा आहे. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने मुलांच्या शिक्षणाची तीव्र इच्छा असतांना आर्थिक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे. त्यातच ग्रामपंचायत मध्ये दिव्यांगासाठी येणारा 5% निधी हा आजपर्यंत एकाही लाभार्थ्याला वाटप झालेला नाही. अनेक वेळा ग्रामपंचायतला विनंती अर्ज करून पाहिले परंतू सुस्तावलेली व्यवस्था याकडे लक्ष द्यायला तयार नाही. सरपंच, ग्रामसेवक, बी.डी.ओ. तहसील कार्यालय इ. ठिकाणी अर्ज दाखल करूनही कुठलीच कारवाई होत नसल्याने आपल्या हक्काचा असणारा निधी जीवन कदम यास मिळत नाही. शासन दरबारी असणार्या दिव्यांगासाठीच्या योजना या फक्त सुस्तावलेल्या कर्मचार्यांमुळे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत पालकांनी बोलून दाखवली. तसेच लवकरात लवकर हा निधी न मिळाल्यास सर्व दिव्यांग संघटनाच्या माध्यमाने मंठा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असे निवेदन त्यांनी दिल्याचे सांगितले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






