भर दिवसा भगवाननगर येथे ५५ हजार रोख तर सव्वा लाखाचे दागिने केले लंपास

स्वराज्य वार्ता / राम राठोड

आष्टी : परतूर तालुक्यात आष्टी येथील भगवाननगर येथे शेतीकामासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याच्या घराचे लॉक तोडून दागिन्यांसह रोख रक्कम लांबवल्याचा प्रकार आष्टी परिसरातील भगवाननगर येथे रविवारी घडला. रोख ५५,००० व १ लाख ३० हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबवले. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात रविवारी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गोपीनाथ कांदे, विनोद वाघमारे यांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. भगवाननगर येथील शेतकरी उत्तम बाबूराव चौरे हे घराचा दरवाजाला कुलूप लावून कुटुंबासह शेतात गेले असता अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटातील कपड्यांची नासधूस करत चोर लॉकरमधील रोख ५५,००० हजार व १ लाख ३० हजारांचे सोन्याचे दागिने घेऊन पळाले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल