श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा;

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे 

परतूर : परतूर तालुक्यातील पाटोदा माव येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालय येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी मुख्याध्यापक श्री सुरेश पाटोदकर सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री गणेशराव खवल व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक श्री पाटोदकर सर यांनी विद्यालयातील वर्षभरात घेण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमाचा आढावा प्रस्ताविकामध्ये घेतला. एसएससी परीक्षा मार्च 2024 मध्ये विद्यालयातून प्रथम आलेला विद्यार्थी श्री प्रदुम्न पांडुरंग खरात याला परतुर येथील डॉक्टर प्रमोद जगताप यांच्याकडून एक हजार रुपये आणि इंग्लिश विषय शिक्षक श्री रोकडे सर यांच्याकडून एक हजार पाचशे रुपये आणि द्वितीय आलेली विद्यार्थिनी कु. रिया भगवान खवल हिला डॉ. जगताप यांच्याकडून एक हजार रुपये आणि इंग्लिश विषय शिक्षक श्री रोकडे सर यांच्याकडून पाचशे रुपये तसेच इंग्लिश विषयामध्ये 85 गुणांपेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या कुमारी कीर्ती विश्वंभर खवल आणि कुमारी ऋतुजा सुधीरराव आठवे यांनाही विषय शिक्षक श्री रोकडे सर यांनी प्रत्येकी पाचशे रुपये बक्षीस दिले तसेच विज्ञान विषयात सर्व प्रथम कु.शेख सानिया नबी हिला मुख्याध्यापक आणि विषय शिक्षक श्री पाटोदकर सर यांच्या कडून रोख एक हजार रुपये बक्षीस देण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांचा अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते रोख रक्कम देऊन व पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच वर्ग नववीतून पहिली आलेली विद्यार्थिनी कुमारी भक्ती जनार्दन खवल हिलाही वर्गशिक्षक श्री रोकडे सर यांच्याकडून एक हजार रुपये रोख रक्कम बक्षीस दिले तसेच वर्ग आठवीतील विद्यार्थी श्री. संस्कार सुधीर आठवे इंग्लिश विषयात 90 गुण प्राप्त केल्याबद्दल इंग्लिश विषय शिक्षक श्री रोकडे सर यांच्याकडून एक हजार रुपये तसेच कुमारी कृतिका पांडुरंग खरात आणि कुमारी अलका श्री.किसन येवले यांना पाचशे रुपये प्रत्येकी रोख रक्कम बक्षीस इंग्लिश विषय शिक्षक श्री रोकडे सर यांच्याकडून देण्यात आले. कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच गाडेकर सर ,जोगदंड सर, माजी विद्यार्थी ,सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होती शेवटी श्री पी. टी. रोकडे सर यांनी सर्वांचे आभार मानले.शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी . एन. सर यांनी केले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल