भाजपचे खंदे कार्यकर्ते माजी सभापती सिध्देश्वर सोळंके यांनी भाजपला सोड चिठ्ठी लवकरच काँग्रेसचा हात हाती घेण्याची आवश्यकता

स्वराज्य वार्ता / सुनिल गायकवाड

आष्टी : परतूर तालुक्यातील अकोली येथील तरुण तडफदार राजकारणातील युवक नेतृत्व सिध्देश्वर सोळंके लवकरच भाजप पक्षाला रामराम ठोकून काँग्रेस पक्षात प्रेवश करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. गेल्या पंधरा वर्ष एकनिष्ठेने भाजप पक्षाच काम करत असताना त्यांनी भाजप युवा मोर्चाचे जालना जिल्हा उपाध्यक्ष म्हणुन काम केलेले आहे. आष्टी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राहिलेले सोळंके यांना आष्टीसह कोकाटे हादगाव सर्कल मध्ये मानणारा मित्र परिवार मोठ्या संख्येने असुन, ते येत्या काही दिवसात त्यांच्या अनेक समर्थकांसह काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. अनेक वर्षापासून भाजप पक्षात निष्ठेने काम करून देखील तिथं हवा त्या प्रमाणत सन्मान मिळत नसल्याचे ही त्यांच्याकडून सांगण्यात आले. नेत्याचे दर्शन घेणारे आणि कानात बोलणारे याच कार्यकर्त्याची चलती तिथं असून, स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या स्पष्ट बोलणाऱ्या अनेक वर्षापासून सोबत असणाऱ्या कार्यकर्त्याला सन्मान मिळत नसल्याची चर्चा ही त्यांनी घेतलेल्या या पक्ष सोडीच्या कारणाने सर्वत्र होताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे येत्या विधासभेला काँग्रेस पक्षाला आष्टी कोकाटे हादगाव हा दोन्ही सर्कल मध्ये चांगलीच बळकटी मिळू शकते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल