पारंबी विद्यालयात ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

स्वराज्य वार्ता / किरण पाटील 

याप्रसंगी गरीब, अनाथ, होतकरू विद्यार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप

जळगाव : माध्यमिक विद्यालय पारंबी येथे नुकताच 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सकाळी 7.30 वाजता कु-हा विभाग एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री रमेश भाऊ शिंपी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान अशा घोषणांनी वातावरण प्रसन्न केले .त्यानंतर गावातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले त्यानंतर नवीन माध्यमिक विद्यालय पारंबीच्या प्रांगणावर श्री रमेशभाऊ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .याप्रसंगी इयत्ता 8 वी ,9 वी, व 10 वीतील 13 विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने विविध शालेयपयोगी वस्तूंचे शाळेचे दप्तर, ड्रेस, टूथपेस्ट, ब्रश आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. तर नववीतील उमरा येथील कु. पल्लवी दादू राठोड व हिवरा येथील सोहम प्रकाश वानखेडे या विद्यार्थ्याना वरील दैनंदिन वस्तू सह सायकल सुद्धा सप्रेम भेट देण्यात आली .याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून देशभक्तीपर गीत सुद्धा सादर केलीत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक तथा सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी केले . प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस.डी. ठाकूर सर यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमेशभाऊ शिंपी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना भावी जीवनामध्ये प्रगती करण्याचे व समाजसेवा करण्याचे सांगितले. शेवटी विद्यालयाचे शिक्षक श्री एस. के. पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी गावकरी श्री एकनाथ विश्वनाथ पाटील, श्री महादेव शंकर गारकड, तसेच मुख्याध्यापक श्री एस.डी. ठाकूर, ज्येष्ठ शिक्षक डॉ. शिवचरण उज्जैनकर ,श्री एस. के. पाटील, श्री एस. एस. नागे ,शिक्षकेतर श्री विनायक इंगळे ,श्री रघुनाथ इंगळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल