आष्टी : परतूर तालुक्यात आज 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिनानिमित्त जमियत उल्मा हिंद आष्टी च्या वतीने भव्य दिव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम जिनत हाल मध्ये आयोजित केले होते या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि सर्व क्षेत्रातल्या व्यापारी शेतकरी सामाजिक शासकीय निमशासकीय राजकीय निम राजकीय धार्मिक गुरुवंतांनी सहभाग नोंदवला रक्तदान हे महादान आहे. गरजू व्यक्तींसाठी जीवनदान ठरणारे रक्तदान करणे ही मानवतेच्या हिताचे कार्य करण्याची मानवाला मिळालेली एक अमूल्य संधी आहे.

सध्या रक्तदान हे काळाची गरज बनले आहे. कारण बदलत्या जीवनशैलीमुळे समाजात विविध आजारांचे वाढणारे प्रमाण, वारंवार होणारे अपघात, शस्त्रक्रियांचे वाढते प्रमाण, यामुळे रक्ताला मागणी खूप आहे. या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन आष्टी सर्कलमधील सर्व बंधूंनी जमियात उल्मा आष्टी च्या वतीने आयोजित या भव्य आणि दिव्य रक्तदान शिबिरात ७१ मतदातांनी आपला रक्तदान केले. जमियत उलमा हिंद आष्टी च्या वतीने सर्व रक्तदात्यांचा आम्ही धन्यवाद करतो आणि त्यांनी हे सर्वश्रेष्ठ काम केलं याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी आपल्या कामात वेळ काढून आमच्या या रक्तदान शिबिरात आपला सहभाग नोंदवला याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत यबद्दल जमियत उलमा हिंद आष्टी चे अध्यक्ष मुफ्ती अलीम कुरेशी यांनी सर्वांचा आभार व्यक्त केला.

यावेळी आष्टी गावाचे सरपंच मधुकर मोरे साहेब उपसरपंच हाफिज नसरुल्लाह साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक आष्टी एपीआय सचिन इंगेवाड सर मदरसाचे नाजीम कारी शमशुद्दिन साहेब जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस हाजी रहमत साहेब पी ए इनामदार हायस्कूलचे मुख्याध्यापक जाकीर हुसेन सर नूतन जिल्हा परिषद उर्दू चे मुख्याध्यापक कलीम सर व्यापारी महासंघ सचिव बाबुभाई पत्रकार संघ आष्टीचे अध्यक्ष अजित भाई जमीनदार पंचायत समितीचे सदस्य रामप्रसाद थोरात सर जमियत उलमा हिंद आष्टी के सचिव मुजीब भाई जमीनदार जनाब रखमाजी कोल्हे अध्यक्ष मेडिकल एसोसिएशन परतुर आष्टी ग्रामपंचायत मेंबरान बळीराम थोरात सईद भाई शेख आसिफ भाई जमींदार अजहर भाई शेख मुर्तुजा कल्याणकर अल्ताफ भाई कुरेशी आसिफ भाई कच्ची रफीक भाई पठान मुजीब भाई पठान प्रकाश डोळस कमळाजी आगलावे ओम प्रकाश थोरात हाफीज आरिफ मौलाना जमीर मौलाना आदिल मौलाना इरफान सत्तार मास्टर राजू कुरेशी हाफिज अजीज फुरकानी उपस्थित होते.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






