बाबुलातारा येथील युवकांचा मोठ्या संख्येने काँग्रेस मध्ये प्रवेश
काँग्रेस पक्ष हा जसामान्यांचा पक्ष -मा.आ.सुरेशकुमार जेथलिया

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे

परतूर /प्रतिनिधी : काँग्रेस पक्ष हा जाणसामान्य जनतेचा पक्ष असून ह्याच पक्षात युवकांना भविष्य असून राज्यात महाविकास घाडीची सत्ता अटळ असल्याचे प्रतिपादन मा.आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी केले. परतूर येथील त्यांच्या जणसंपर्क कार्यालयात बाबूलतारा येथील युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला.यावेळी प्रमुख पाहुण्यात काँग्रेस तालुकाप्रमुख बाबासाहेब गाडगे, जिल्हा परिषद सदस्य इंद्रजित घनवट,लक्ष्मण शिंदे, शाकेर मापेगावकर, दत्ता अंभुरे , अनंता भारसाखळे , प्रवीण डुकरे, विभागध्यक्ष गणेश काळे आदींची उपस्तिती होती. यावेळी आपल्या मार्गदर्शनात ते पुढे म्हणाले कि दिशाहीन पक्षावर विश्वास ठेवत अनेक युवाकांची आजवर फसगत झाली आहे. मात्र अलीकडे युवा मंडळी देखील जागृता झाली आहे. काँग्रेस पक्ष हा युवकाना, देशाला दिशा देणारा पक्ष असून सर्व जातीचा सन्मान करणारा पक्ष म्हणून काँग्रेस कडे पाहिले जाते. येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत सत्तान्तर अटळ असून महाविकासआघाडी सत्तेत येणार आहे . कार्यकर्त्यांनो जोमाने कामाला लागा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. दरम्यान यावेळी वलखेड येथील परमेश्वर बिल्लारे, बाबुरातारा येथील सोमनाथ शाहुराव काळे, शरद हरिभाऊ देवकर, लक्ष्मण बाबासाहेब मुळे, अजय श्रीराम वाघमारे, अविनाश पंढरीनाथ मखर, योगेश सुभाष काळे, शंकर महादेव मुळे, रामेश्वर श्रीरंग नाईकवाडे सह अनेक युवकांनी मा.आ.सुरेशकुमार जेथलिया, नितीन जेथलिया, बाबासाहेब गाडगे, इंद्रजित घनवट यांच्या नेतृवावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रमुख नेत्यांच्या हस्ते पक्षाचे रुमाल व हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण डुकरे तर सूत्रसंचालन इंद्रजित घनवट तर आभार गणेश काळे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्तिथी होती.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल