स्वराज्य वार्ता / किरण पाटील
जळगाव : सालाबादप्रमाणे माननीय शिक्षणाधिकारी मा. जि प जळगाव मा.शिक्षणाधिकारी प्राथमिक जि प जळगाव यांच्या पत्रानुसार गट 1ला 7 वर्ष वयोगट, गट 2रा 7-9 वर्ष वयोगट, गट 3रा 9-12 वर्ष वयोगट ,गट 4था 12-16 वर्ष वयोगट यानुसार निमखेडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री गणेश कोळी यांनी डोलारखेडा ,चिंचखेडे बुद्रुक, नांदेड ,वायला ,टाकळी ,निमखेडी, प्राथमिक आश्रम शाळा चारठाणा ,ज्ञानपूर्ण विद्यालय इच्छापुर ,महालखेडा या शाळेतील मुख्याध्यापकांच्या सहकार्याने व शिक्षकांच्या मदतीने 293 विद्यार्थी यांना दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी बाल चित्रकला स्पर्धा 2024 याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला. चित्र काढण्यात अतिशय रंगलेले दिसून आले. याबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री मदन मोरे सर यांनी या केंद्रातील सर्वांचे कौतुक करून त्यांना प्रेरणा देण्याचे काम केले. तसेच हर घर तिरंगा कार्यक्रमासाठी गावातील विद्यार्थ्यांची रॅली, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, तसेच नवभारत साक्षरता जनजागृतीसाठी कार्यक्रम राबवण्याचे आव्हान देखील मा.गटशिक्षणाधिकारी मुक्ताईनगर श्री मदन मोरे सर यांनी केंद्रप्रमुख गणेश कोळी ,मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांना केले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






