मुक्ताईनगरात पत्रकारांच्या सर्तकतेने लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांना केला स्वाधीन

स्वराज्य वार्ता / किरण पाटील 

जळगाव : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा मध्यप्रदेशातील बुरहाणपुर वरुन मुक्ताईनगर मार्गे जळगाव येथे जात असलेला लाखो रुपयांचा गुटखा पत्रकार नितिन सुरवाडे जि एस नाइन न्युज जळगाव जिल्हा प्रतिनिधी,अर्जुन आसणे नवराष्ट्र तालुका प्रतिनिधी मुक्ताईनगर बोदवड प्रतिनिधी,जयराज पवार महा इंडिया न्युज संपादक,चेतन तायडे महा इंडिया न्यूज उपसंपादक यांनी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात दिली. सविस्तर वृत असे की ,दि.9 रोजी सकाळी 12वाजेच्या सुमारास सदर पत्रकार हे मुक्ताईनगर मार्गे रावेर खासगी कामासाठी जात असतांना बोलोरो पिक क्रमांक एम.एच15.एच.एच.1088 क्रमांकाची गाडी भरधाव वेगाने मुक्ताईनगर कडे पुरनाड फाट्यावरून जात असतांना गाडी चालकाच्या हालचाली वरून सदर गाडीमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा असल्याची शंका आल्याने पुरनाड फाट्याजवळ गाडी थांबवली असता सदर गाडी चालक याची विचारपूस केली असता एवढ्या भरधाव वेगाने गाडी का चालवत आहे असे विचारले असता गाडी मध्ये अवैध गुटखा असल्याची कबुली गाडी चालकाने दिली तसेच तात्काळ दुरध्वनीद्वारे मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.राजकुमार शिंदे साहेब यांना संपर्क करून संबंधित गाडीमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा असल्याची कबुली गाडी चालकाने दिली आहे तरी आपण आपल्या पोलिस कर्मचारी यांना घटनास्थळी पाठवावे व गाडी ताब्यात घ्यावी असे सांगण्यात आले त्या अनुषंगाने काही मिनिटांतच दोन पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व सदर गाडी पोलिस स्टेशन मध्ये आणण्यात आली व चालक चेतन बारी रा.जळगांव यांना पत्रकारांनसमोर विचारपूस केली असता मुळ जळगाव चे असल्याचे सांगितले सदर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिस स्टेशन मध्ये चालु होती.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल