श्री. समर्थ विद्यालय पाटोदा माव व श्री.स्वामी विवेकानंद महाविद्यालय मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने पाटोदा येथे वृक्षारोपण;

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे

परतुर प्रतिनिधी : परतुर तालुक्यातील श्री समर्थ माध्यमिक विद्यालय पाटोदा माव व स्वामी विवेकानंद महाविद्यालय मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने २९ जुलै रोजी पाटोदा येथील गणपती देवस्थान समोर मोकळ्या जागेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले यात वड, पिंपळ, लिंब, करंजी, व चिंच आदी वृक्षांची लागवड करण्यात आली. आणि त्या झाडांना काटेरी कुंपण सुद्धा करण्यात आले ,या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुरेश पाटोदकर सर, स्वामी विवेकानंद महाविद्यालय मंठा येथील एन.एन.एस विभाग प्रमुख प्रा.काळे सर ,प्रा.पांडूरंग नवल सर , प्रा.उढाण सर यांच्या सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर,एन.एन.एस प्रमुख प्रा.काळे सर,प्रा.पांडूरंग नवल व प्रा.उढाण सर यांनी वृक्षरोपणाचे महत्व विशद केले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पाराजी रोकडे यांनी केले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल