संत तुकाराम विद्यालय लिखीत पिंपरी येथे किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न;

विद्यार्थ्यांनी निर्भयपणे जीवन जगावे – सपोनि सचिन इंगेवाड

आष्टी प्रतिनिधी राम राठोड :- परतुर तालुक्यातील लिखीत पिंपरी येथील संत तुकाराम विद्यालयात सध्या वाढत्या बाल लैंगिक शोषणाच्या पार्श्वभूमीवर

शनिवारी पोक्सो कायदा, सायबर क्राईम याविषयी
लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण व्हावे यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आष्टी पोलीस स्टेशनचे सपोनि सचिन इंगेवाड, प्रा.सौ कल्पना भागवत, सामाजिक कार्यकर्ते विष्णू सोळंके, प्रा.डॉ विनोद भागवत, संस्थेचे अध्यक्ष रामकिसन सोळंके यांची प्रमुख उपस्थिती उपस्थिती होती.

यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक सपोनि सचिन इंगेवाड यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्यासंदर्भात सविस्तर माहिती मार्गदर्शन करून विद्यार्थी व शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. लैंगिक शोषण होत असल्यास मुलामुलींनी निर्भयपणे समोर येऊन अशा गुन्ह्यांची तक्रार केली पाहिजे.तक्रार देणा-या विद्यार्थ्यांची नावे गोपनीय ठेवली जातात त्यामुळे घाबरून न जाता पुढे आले पाहिजे.

यावेळी विष्णू सोळंके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना “विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी सातत्याने सकारात्मक बदल स्वीकारून स्वतःची, शाळेची, आपल्या कुटुंबाची आणि समाजाची प्रगती करावी असे सांगून ऑलिंपिक स्पर्धेतील खेळाडूंचा आदर्श घेऊन प्रगती साधावी असे आवाहन केले.‌प्रा सौ.कल्पना भागवत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात “शाळेतील मुले आणि मुली यांनी आई-वडीलांचे कष्टाची जाणीव ठेवून स्वयंशिस्त, संस्कारक्षम आचरण करावे असे सांगितले. यावेळी विजयाताई सोळंके,गोपनीय शाखेचे सज्जन काकडे, मुख्याध्यापिका सौ वर्षा शिंदे, संदिप सोळंके यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कु. ऋतुजा आर्दड हिने सुत्रसंचलन तर कु. संध्या चौधरीने आभार मानले.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल