यावर्षीचा भारत उद्योग रत्न 2024पुरस्कार अभयकुमार. काळुंके यांना प्रदान करण्यात आला

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे

जालना प्रतिनिधी : प्रतिष्ठित, प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री मिस श्रिया सरन यांच्या हस्ते उद्यानपंडित श्री.अभयकुमार बाजीराव काळुंके यांना कृषी व रोपवाटिका क्षेत्रात केलेल्या महाराष्ट्र इतर सहा राज्यात भरीव कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावरचा भारत उद्योग रत्न 2024 पुरस्कार प्रदान करण्यात आला.<br> हा पुरस्कार सोहळा दिनांक 30 जुलै 2024 रोजी मुंबई येथे भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृह दहिसर मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. विविध उद्योग क्षेत्रात प्रेरणादायी व उल्लेखनीय कार्य केलेल्या भारतातून सर्वच राज्यातील 37 व्यक्तींना रिसिलिन या भारतीय चित्रपट निर्मिती करणाऱ्या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो. त्यामध्ये कृषी व रोपवाटिके क्षेत्रात केलेल्या अभयकुमार बाजीराव काळुंके यांच्या कार्याची दखल घेत यावर्षीचा भारत उद्योग रत्न 2024 पुरस्कार स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. त्याबद्दल छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल परिवारातर्फे संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार काळुंके तसेच त्यांच्या या कार्यात त्यांना नेहमी साथ देणारे काळुंके परिवारातील सर्व सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल