स्वराज्य वार्ता / किरण पाटील
जळगाव : मुक्ताईनगर तहसीलदार श्री गिरीश वखारे साहेबांना महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांनी जुलै अखेरचे धान्य त्वरित वाटपासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज निवेदन मुक्ताईनगर येथे देण्यात आले. यामध्ये स्वस्त धान्य दुकानदार यांचे मशीन मध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे दुकानदारांनी जुलै व ऑगस्टचे अजून धान्य वाटप केले नाही. तांत्रिक बिघाड आहे, मशीन बंद आहे असे कारणे स्वस्त धान्य दुकानदार नागरिकांना देत आहे. त्यावर त्यांच्या संघटनेचा जिल्ह्यावर निवेदन देऊन मशीन बिघाड आहे तांत्रिक अडचण दाखवून लाभार्थ्यांना एक एक दोन दोन महिने धान्य वितरित होत नाही मशीन बंद तर महिन्याचे लागणारे धान्य खाणे बंद होईल का? असा प्रश्न मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई यांनी श्री.वखारे साहेबांशी केला.दुकान दारांचे बोलणे तहसीलदारांना तक्रार करा अर्ज द्या अशा पद्धतीनं दुकानदार वरचड भाषा करत आहेत. त्यावर तहसीलदार यांनी दिनांक ३ ऑगस्ट पासून ऑफ लाईन अथवा ऑनलाईन धान्य वितरण प्रणाली चालू करायला मनसे निवेदना नंतर अश्वासित केले. याप्रसंगी मनसे मुक्ताईनगर अध्यक्ष मधुकर भोई,शहर अध्यक्ष मंगेश कोळी,गट अध्यक्ष सुनील कोळी,संपर्क अध्यक्ष विजय भोलाने ,विनोद एकनाथ पाटील,गजानन पाटील,ग्रामस्थ काशिनाथ ठाकरे,विजू कोळी उपस्थित होते.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






