आष्टी पोलिसांनी हद्दीतील अवैध दारू, मटका अड्ड्यांवर धडक कारवाया करून मुद्देमाल जप्त केला आहे.
स्वराज्य वार्ता / राम राठोड
आष्टी/प्रतिनिधी : आष्टी पोलिसांनी लिंगसा व श्रीष्टी तांडा या दोन गावात धाडी टाकून चार ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत गावठी, हातभट्टी दारू विक्रेत्यांसह मटका घेणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून आष्टी पोलीस अवैध धंद्या विरुध्द अॅक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. लिंगसा (ता. परतूर) येथे टाकलेल्या धाडीत पोलिसांना २ हजार रूपये किमतीच्या २० सिलबंद देशी दारूच्या भिंगरी बाटल्या मिळाल्या आहे. या अधावर रावसाहेब कोंडीबा उकांडे (वय ६०) याच्याकडे हा माल मिळून आल्याने पोकॉ. बन्सी पानजंजाळ याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला तर याच गावात आणखी एका ठिकाणी केलेल्या कार्यवाहीत सतीष गंगाधर उकांडे (वय २६) याच्याकडे १५०० रुपये किमतीच्या १५ देशी दारूच्या बाटल्या सापडल्या आहे. पोकॉ. दीपक सोनुने यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला. लिंगसा येथीलच हनुमान नाथाराव डवले (वय ३०) हा लोकांकडून पैसे घेऊन त्यांना जास्त पैशाचे आमिष दाखवत चिठ्यावर आकडे लिहून कल्याण नावाचा मटका जुगार खेळ खेळतांना व खेळवीत असताना मिळून आला. त्याच्या ताब्यातून मटक्याचे साहित्य व रोख १०८० रुपये जप्त करण्यात आले. पोकॉ. दीपक सोनुने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. सपोनि. सचिन इंगेवाड यांच्या मार्गदर्शना खाली या तिन्ही कार्यवाहीचा जी. डी. पोलवे पुढील तपास करीत आहेत. तर श्रीष्टी तांडा येथे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एका स्टीलच्या टाकीत २५०० रूपये किंमतीची ५० लिटर गावठी देशी दारूआढळून आली. पो.कॉ. दीपक सोनुने यांच्या फिर्यादी वरून शाम पुना चव्हाण (वय ३८) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक फौजदार मुंढे हे करीत आहे.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






