स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे
परतूर प्रतिनिधी : लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालय परतूर येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती चे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भारत खंदारे हे होते प्रमुख उपस्थितीमध्ये महाविद्यालयाचे प्रभारी उपप्राचार्य जे एम ईघारे, पर्यवेक्षक ए पी सोन पावले सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक आर एस गायकवाड तसेच वरिष्ठ प्राध्यापक आर बी राठोड , आर जी जोशी , प्राध्यापक बी डी चव्हाण उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते उपप्राचार्य संभाजी तिडके (स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मंठा) होते कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक विभाग प्रमुख गायकवाड सर यांच्या प्रास्तविकेने करण्यात आली . प्रमुख वक्ते तिडके सरांनी विद्यार्थ्यांना पुस्तकाचा व्यासंग धरा त्याचबरोबर महामानवांचे चरित्र वाचा असा उद्देश केला त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर जास्त न करता पुस्तकांचा वापर करा असे सांगितले त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य भारत खंदारे सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले या कार्यक्रमास महाविद्यालयीन कर्मचारी प्रा रिंढे एस एम ,प्राध्यापक जी एस अग्रवाल प्राध्यापक पि टी राठोड प्राध्यापक लक्ष्मण खालापूरे प्राध्यापक जी एस खरात प्राध्यापक आय डी खरात प्राध्यापक जागृत डी के प्राध्यापक भगवान वाघराळ ए आर.जाधव प्राध्यापक चामे डी एम प्राध्यापिका श्रीमती दळवी के के प्राध्यापिका श्रीमती.. कात्रे एम. एस हे उपस्थित होते.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






