कोथळी येथे शेतकऱ्यांसाठी बँकेचा प्रस्ताव तयार करण्याचे प्रात्यक्षिक

स्वराज्य वार्ता/ किरण पाटील

जळगाव :

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील विद्यार्थिनी प्रेरणा बाविस्कर, दिप्ती चऱ्हाटे, समृद्धी कडू, कल्याणी महाले, तेजस्विनी निकम, खुशबु पाटील, दीक्षा सोनवणे, स्नेहल इरसे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत कोथळी येथे शेतकऱ्यासाठी बँकेचा प्रस्ताव तयार करण्याचे प्रात्यक्षिक केले. कृषी क्षेत्रात विस्तारीकरण किंवा अनुकूल नवीन तंत्रज्ञानासाठी पत ही शेतकऱ्याची मूलभूत गरज आहे. गावपातळीवर विविध बँका शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे कर्ज किंवा मध्यम मुदतीच्या कर्जासाठी पीक कर्ज म्हणून कर्ज सुविधा देतात. शेतकरी जमीनदार किंवा सावकाराकडून कर्ज घेतात आणि या कर्जावर खूप जास्त व्याज असते. या प्रात्यक्षिकामुळे शेतकऱ्यांना बँकेची भूमिका समजण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांनी बँकेच्या प्रस्तावाचा अवलंब केला आहे.या कार्यक्रमाकरिता प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समनव्यक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम प्रा.ए डि मत्ते व समन्वयक यांचे मार्गदर्शन लाभले.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल