परतूरदवंडे प्रतिनिधी हनुमंत
दिनांक 28 /7 /2024 रोजी भीमसेना ऊसतोड कामगार संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक परतुर विश्रामगृह येथे संपन्न झाली. या वेळी चोखाजी नाना सौंदर्य मराठवाडा अध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष, माननीय धम्मानंद साळवे समन्वयक अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.भीमसेना ऊसतोड कामगार संघटनेची जिल्हा समन्वयक म्हणून लक्ष्मण कोळे, नमन मोरे, बबन साळवे, मळीबा वाघमारे, शेख जमीर भाई,तालुका समन्वयक वसंत राणोजी भिसे, संभाजी झोरे, जालिंदर वाघमारे, लक्ष्मण वावळे आप्पासाहेब किसनराव सोनपसारे, विकास लिंबाजी सोनवणे, नागनाथ शामराव चौगुले. यांची सर्वानुमते बैठकीत निवड करण्यात आली. यावेळी ऊसतोड कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. ऊसतोड कामगाराच्या प्रमुख मागण्या.
1) उसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणा साठी कायमस्वरूपी वसतिगृह सुरु करण्यात यावे
2)कारखान्या मार्फत ऊसतोड मजुरांची नोंदणी करावी.
3) ऊसतोड कामगारांना निर्वाह भत्ता देण्यात यावा.
4) ऊसतोड कामगारांसाठी शासनामार्फत महामंडळ स्थापन करून निधी देण्यात यावा.
5) ऊसतोड कामगारांना विम्याची तरतूद करण्यात यावी.व दहा लाखापर्यंत देण्यात यावा.
6) ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणात व नोकरीत आरक्षण देण्यात यावे.यावेळी उपस्थित
नेमिनाथ नाटकर,खंडू नाटकर, वसंत भिसे, नारायण कांबळे शेख जमीर भाई, जीवन सोनवणे,वाल्मीक थोरात, अजय वाघमारे,जालिंदर वाघमारे, अमोल गोटे कृष्णा सोनवणे, संभाझोरे, संदीप वाहुळे,पप्पू वाहुळे, समाधान सरवदे,लक्ष्मण वाहुळे, भरत झोरे,विलास सोनवणे, आप्पासाहेब सोनपसारे, लक्ष्मण कोळे, सिद्धार्थ कांबळे,नारायण थोरात, नागनाथ चौगुले गंगाधर खरात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख जमीर भाई यांनी केले तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ कांबळे यांनी मानले.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






