नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथील 14विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप

स्वराज्य वार्ता / किरण पाटील

जळगाव : मानव विकास योजनेअंतर्गत सन 2023- 24 या वर्षातील इयत्ता आठवी व नववीच्या एकूण 14 विद्यार्थिनींना सायकलीचे नुकतेच विद्यालयात वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुरे विभाग एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. वसंतराव गणपतराव पाटील अध्यक्षस्थानी होते .या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाची माहिती दिली त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस.डी. ठाकूर सर यांनी श्री वसंतराव पाटील यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. त्यानंतर मुख्याध्यापक श्री ठाकूर सर यांनी मानव विकास योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या मुलींसाठी सायकलीच्या संदर्भात महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यानंतर अध्यक्ष महोदय श्री वसंतराव पाटील यांच्या शुभहस्ते उमरा व हिवरा या खेड्यावरील एकूण 14 मुलींना सायकलीचे वाटप करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना या सायकलचा योग्य वापर करून अभ्यासामध्ये लक्ष घालावे असे सुद्धा त्यांनी सुचित केले .पुढे म्हणाले की, शासनाचे उपक्रम स्तुत्य असतात त्याचा योग्य वापर केला पाहिजे असेही ते म्हणाले.याप्रसंगी शिक्षक श्री एस. के. पाटील ,श्री एस. एस. नागे ,श्री सोनवणे, शिक्षकेतर श्री रघुनाथ इंगळे ,श्री विनायक इंगळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल