विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मा.आ. जेथलिया यांची परतूर तालुकास्तरीय आढावा बैठक!

परतूर /प्रतिनिधी हनुमंत दवंडे

येणाऱ्या विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मा.आ. सुरेशकुमार जेथलिया यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दिनांक 23 जुलै मंगळवार रोजी परतूर तालुका काँग्रेस पक्षाची महत्वाची आढावा बैठक होणार असल्याचे काँग्रेस कमिटीच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
येथील कृष्णमोती हॉटेल मध्ये संपन्न होणाऱ्या या बैठकीला दुपारी एक वाजता सुरवात होणार असून, येणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने पदाधिकारी, कार्यकर्ते समन्वयं व बूथबांधणी या दृष्टीने सदरील आढावा बैठकीचे आयोजन केले असून तालुक्यातील आजी-माजी काँग्रेस पदाधिकारी, सहकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सदरील पत्रकात करण्यात आले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल