परतूरमध्ये लालबहादूर शास्त्री विद्यालयात शिक्षण सप्ताहास उत्साहात प्रारंभ.

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे

परतूर प्रतिनिधी : परतूर,दि.२२ – येथील शिवाजीनगरमधील लालबहादूर शास्त्री विद्यालयात सोमवारपासून (दि. २२) शिक्षण सप्ताहास उत्साहाच्या वातावरणात प्रारंभ झाला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एल. के. बिरादार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक आर.टी. राऊत, टी.जी. घुगे,आर. के. पवार,क्रीडाविभाग प्रमुख पी. बी. निर्वळ, आर. पी. आकणीकर, सहशिक्षिका सी. बी. लड्डा यांची उपस्थिती होती.दरम्यान, सोमवारी पहिल्या दिवशी ‘ अध्ययन अध्यापन साहित्य दिवस ‘ उपक्रमांतर्गत शालेय साहित्याचे महत्व विषद करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्याध्यापक बिरादार सर म्हणाले की, २२ ते २८ जुलै या कालावधीत शाळेत शिक्षण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.साक्षरता दिन, क्रीडा दिन, सांस्कृतिक दिन, कौशल्य व डिजिटल उपक्रम दिन,शालेय पोषण दिन,समुदाय सहभाग दिन इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी, शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा, वेळेचे बंधन पाळावे, मोबाईलचा वापर आवश्यक तेवढाच करावा, आई-वडील तसेच गुरुजणांच्या सूचनांचे पालन करावे असेही बिरादार म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख बालाजी ढोबळे यांनी केले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल