राष्ट्रवादीचे कपिल आकात यांचा आज पासून संवाद दौरा.

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे

परतूर प्रतिनिधी : आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जन संवाद दौरा माजी सभापती तथा युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. रविवार पासुन या दौऱ्याला सुरुवात होणार असून परतूर विधानसभा मतदार संघातील आष्टी आणि कोकाटे हदगाव सर्कल मधील गावांना कपिल आकात रविवारी भेटी देणार आहेत. आष्टी येथील लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयात या सर्कल मधील कार्यकर्त्यांचा मेळावा या निमित्ताने आयोजित करण्यात आला. मंगळवारी श्रीष्टी सर्कल, बुधवारी परतूर शहर, गुरूवारी सातोना सर्कल, शुक्रवारी वाटूर सर्कल मधील गावात कपिल आकात पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांशी संवाद साधणार आहे. जास्तीत जास्त पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या संवाद दौऱ्यात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी केले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल