परतूर प्रतिनिधी -हनुमंत दवंडे
दि.१९/०७/२०२४ वार शुक्रवार रोजी तालुका विधी सेवा समिती व वकील संघ परतुर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा परतुर या ठिकाणी कायदेविषयक शिबिर घेण्यात आली.सदरील शिबिराला परतूर न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश क स्तर एल.डी. कोरडे तसेच सह न्यायाधीश आर.बी.सूर्यवंशी वकील संघाचे अध्यक्ष महेंद्र वेडेकर सचिव, सुरेश काळे, टी.व्ही मगर, माजेद पटेल यांनी या शिबिरा प्रसंगी वेगवेगळ्या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील आखाडे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. दया काटे यांनी केले. यावेळी शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोफत व सक्तीचे शिक्षण हा भारतातील सर्व बालकांचा मूलभूत अधिकार – ॲड. सुरेश काळे.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






