विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांची पंढरपूरात मुक्ताई पालखी सोहळ्यास भेट

जळगाव: विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम ताई गोऱ्हे यांनी दि.15 जुलै,सोमवार रोजी पंढरपुर येथे श्री संत मुक्ताबाई मठ येथे भेट दिली व आदिशक्ती मुक्ताईच्या पादुकाचे दर्शन घेतले.मुक्ताई मठ येथे सर्व वारकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले लाडली बहीण योजना तसेच वारकऱ्यांच्या संदर्भात मोफत यात्रा,पेन्शन योजना याबाबबत सफल मार्गर्दर्शन केले. संस्थानच्या वतीने प्रतिभा ताई पाटील,अंकिता ताई पाटील यांनी निलमताई गोऱ्हे यांचा सत्कार केला तसेच अध्यक्ष ॲड.रविंद्र भैयासाहेब पाटील यांनी आभार मानले तसेच ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे यांनी पंढरपुर येथील मुक्ताई मठ बद्दल माहिती दिली व तेथील समस्याबद्दल चर्चा केली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या प्रचार-प्रसार समन्वयक प्रा.डॉ. ज्योतीताई वाघमारे, ह.भ.प. अक्षय महाराज भोसले, प्रदेशाध्यक्ष शिवसेना धर्मवीर आध्यत्मिक सेना,पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे,मुक्ताई संस्थान विश्वस्त पंजाबराव प्रल्हादराव पाटील, संदीप पाटील, सम्राट पाटील, ह.भ.प.विशाल महाराज खोले उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल