खते, बियाणे, कीटकनाशक, यावर किंमती पेक्षा जास्त घेतले जातात दर; आष्टी व्यापाऱ्यांच्या मनमानीला कृषी अधिकाऱ्यांची अर्थपूर्ण सहमती

आष्टी परिसरात शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांच्या हप्तेखोरीमुळे मोजावी लागते अव्वाच्या सव्वा किंमत

स्वराज्य वार्ता / प्रदीप वक्ते 

शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणारा नेता कोण ?

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे कृषी सेवा केंद्र चालकांकडून होत आहे आर्थिक लूट जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात असलेल्या आष्टी शहरात जवळ पास चाळीस खेड्यांची बाजार पेठ समजले जाते पण त्या बाजार पेठेत कृषी विभागाच्या लाचखोर अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूट आष्टी येथील व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.

अशी चर्चा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये होताना दिसत आहे. वरवर शेतकरी अधिकाऱ्यांना विनंत्या अर्ज करून सुद्धा कसलीही कार्यवाही या व्यापाऱ्यांवर होताना दिसत नाही.

स्थानिक शेतकऱ्यांकडून बोलला जात आहे की आम्ही अधिकाऱ्यांना महिन्याला पैसे देतो म्हणून अधिकारी आमचे काहीही वाकड करू शकत नाहीत. त्या आम्ही हप्ता देऊ खुश ठेवतो त्यामुळे आम्ही भावफलक, साठा, असलेली माहिती दुकानाच्या बाहेर लावत नाही. त्याची आम्हाला गरज नाही.

असे व्यापारी शेतकऱ्यांना सांगतात तुम्हाला ह्या भावात घ्यायचे तर घ्या नसत काहीही मिळणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा. तर वरवर शेतकऱ्यांनी सूचना देऊन सुद्धा जिल्हा कृषी अधिकारी कापसे, तालुका कृषी अधिकारी सांगवे, व आष्टी कृषी सहाय्यक आनंदराव यांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात येत आहे.

जर आपणास कसलीही लालसा मग का शेतकऱ्यांना आपली मदत मिळत नाही. हे जर अधिकारी भ्रष्ट असतील तर शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडवणार असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित झाला आहे.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- अमोल हातागळे ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल