परमार्थ प्राप्तीसाठी भगवंताचे नामस्मरण करणे आवश्यक : सोनालीताई करपे

प्रतिनिधी/आष्टी :- मनुष्य जीवन जगत असताना प्रपंचासोबतच भगवंताचे नामस्मरण स्वच्छ मनाने करणे आवश्यक आहे.

स्वच्छ मनाने भगवंताचे नामस्मरण केल्याने भगवंत ही आपल्या भक्तांवर लाख पटीने प्रेम करतो आणि त्याचे एकदा प्रेम प्राप्त झाले की आपल्याला परमार्थ प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही, असे प्रतिपादन सोनालीताई करपे यांनी केले. परतूर तालुक्यातील आष्टी येथील ग्रामदैवत खंडोबा मंदिर येथे भक्तिमय वातावरणात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह सोहळ्यात शनिवारी (३०) रात्री दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनसेवेत सोनालीताई करपे बोलत होत्या. “तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम..’जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी प्रपंच सोडून भगवंताचे असे नामस्मरण केले होते की त्याचा परिणाम म्हणून महाराजांच्या आजूबाजूला जे वृक्ष, वेली, झाडे, झुडपे, पशू, पक्षीसुद्धा भजन करत होते. आणि आम्ही आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या विचारांना मानतो. मात्र ते आचरणात आणत नाहीत. तेच आपले हित करू शकतात. प्राप्त मानव जिवाची आत्मिक उन्नती संत विचारात आहे. त्याच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल