मार्टी’ची स्थापना करण्याची माणगी;

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे

परतूर/प्रतिनिधी : मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्युटची स्थापना करून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्यावतीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुस्लिम समाज हा पुरोगामी महाराष्ट्रात मागासलेला आहे. महेमदूर खान समितीच्या अहवालतून हे सिद्ध झालेले आहे. मुस्लीम समाजाचा मागासळेपणा दूर करण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी व मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अल्पसंख्यांक विभागाने मौलाना आझाद रिसर्च ट्रैनिंग इन्स्टिटयूट (मार्टी) ची स्थापना करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. परंतु वित्त विभागाने तो नाकाराला आहे. सर्व समाजाचा समांतर विकास हे पुरोगामी महाराष्टाचे धोरण आहे. इतर समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी बार्टी, सारथी, महाज्योती अशा संस्था काम करत असताना मराठी मुसलमानांवार अन्याय का, असा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. मुस्लिम समाजाच्या विकासासाठी मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्युटची स्थापना करावी अशी मागणी करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार) जिल्हाध्यक्ष कपील आकात, माजी नगराध्यक्ष विनायक काळे, सय्यद आरेफ अली, विजय राखे, अखिल पठाण, अंकुश तेलगड, अखिल काजी इतरांच्या सह्या आहेत.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल