स्वराज्य वार्ता / प्रदीप वक्ते
‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथ वाचन कार्यक्रमाची उत्साहात झाली सांगता

आषाढी पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत तीन महिन्यांच्या कालावधीत आष्टी शहरातील भिम नगर येथील समता बौद्ध विहारात सुरु असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पवित्र ग्रंथाचे वाचन व पहिलंच वर्ष कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली.

शिक्षक रमेश पौळ यांनी या पवित्र ग्रंथाचे वाचन केले. तीन महिने सुरू असलेल्या या कार्यक्रमात शहरातील बौद्ध उपासक व उपासिकांनी नियमितपणे ग्रंथ श्रवण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी 9:45 वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर दुपारी 12:00 35 मिनिटांनी आष्टी येथे बस स्टँड परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्प अर्पण करून धम्म रॅली काढण्यात आली तसेच यावेळी भिक्खू संघाने पंचशील देऊ व धम्मदेसने देऊन या कार्यक्रमाचे सांगता झाली.

या कार्यक्रमानिमित्त डॉ.एस.आर इदवंस महाथेरो, पूज्य भदंन्त पि. धम्मानंद थेरो, भन्ते मोग्गालायन, भन्ते शांतीरत्न, भन्ते विवेकानंद, भन्ते संघानंद, भन्ते शिलानंद हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल मोरे, योगेश मोरे, गणेश गायकवाड, सोनू मोरे, गौतम शेळके, मधुकर मोरे,भारत मोरे, राहुल मोरे, अनिल मोरे, कपिल मोरे, यांच्यासह असंख्य तरुण मित्रमंडळाने परिश्रम घेतले व बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






